Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मद्यधुंद चालकाचे ट्रक वरचे नियंत्रण सुटल्याने ट्रकचा आपघात 

बुलढाणा प्रतिनिधी - मद्यधुंद ट्रक चालकाचे ट्रक वरचे नियंत्रण सुटून ट्रक पलटी झाल्याची घटना आज सायंकाळी  सुमारास नांदुरा रोडवरील हॉटेल गौरव समोर

गाईला वाचविण्याचा प्रयत्नात चौघांचा मृत्यू.
अकोल्यामध्ये ट्रकच्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू
बुलढाण्यात भरधाव कारच्या धडकेत तीन महिला ठार

बुलढाणा प्रतिनिधी – मद्यधुंद ट्रक चालकाचे ट्रक वरचे नियंत्रण सुटून ट्रक पलटी झाल्याची घटना आज सायंकाळी  सुमारास नांदुरा रोडवरील हॉटेल गौरव समोर घडली आहे. या अपघातात चालक व क्लिनर दोघेही जखमी झाले असून त्यांना उपचाराचे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.नागपूर वरून मलकापूर येथे पुठ्ठा तयार करण्यासाठी लागणाऱ्या बारीक पावडरचा भरलेला ट्रक क्र.एम एच.४०.ए के.४४४७ याने जलंब नाक्यावर एका सायकल चालकाला कट मारला. यावेळी नागरिकांनी ट्रक चालकाचा पाठलाग केला असता ट्रक चालक अतिशय वेगाने नांदुऱ्याकडे पळाला. मात्र ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने सदर ट्रक नांदुरा रोडवरील हॉटेल गौरव समोरील वळणावर दुभाजक वरून पलटी झाला. यामध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातात ट्रकचालक ज्ञानेश्वर अंमलकार वय 47 राहणार काळेगाव व क्लीनर अवधेश प्रताप कुशवाह वय 25 राहणार बांधा उत्तर प्रदेश हे दोघेही जखमी झाले असून दोघांनाही प्रथम उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र ड्रायव्हरचा जबडा फॅक्चर झाला असून तसेच गुडघ्याची वाटी पूर्णपणे तुटली असून त्याच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.

COMMENTS