Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवासी डॉक्टर बेमुदत संपावर

22 सरकारी रुग्णालयातील 7 हजार डॉक्टरांचा संपात सहभाग

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटना अर्थात मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने सोमवारपासून राज्यात बेमुदत संप पुकारला आहे.

नाशिक मंडळामध्ये वीजचोरीविरुद्ध मोहीम एकाच दिवसात २६१ जणांवर कारवाई
संसदेत असंसदीय शब्दांना निर्बंध
या शाळेतील अंदाधुंद गोळीबारात २१ जणांचा मृत्यू I LOKNews24

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटना अर्थात मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने सोमवारपासून राज्यात बेमुदत संप पुकारला आहे. संप सुरू असल्याने अतिदक्षता विभाग वगळता बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) आणि नियमित आंतररुग्णसेवा बंद केली जाणार असल्याची माहिती मार्ड संघटनेकडून देण्यात आली आहे.
राज्यातील एकूण 22 सरकारी रुग्णालयातील जवळपास 7 हजार निवासी डॉक्टर या संपात सहभागी झाले आहेत. रुग्णालय प्रशासनाकडूनही संपाच्या पार्श्‍वभूमीवर विशेष नियोजन करण्यात आलं आहे. निवास डॉक्टर संपावर जाणार असल्याने वरिष्ठ डॉक्टर आणि प्राध्यापकांकडे विविध जबाबदार्‍या सोपवण्यात आल्या आहेत.सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि सरकारी रुग्णालयात निवास डॉक्टरांची संख्या मोठी आहे. त्यामुळे संपामुळे रुग्णांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबईतील सरकारी रुग्णालयात देशभरातून रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. विविध वैद्यकीय चाचणी, ओपीडी आणि वैद्यकीय सल्ला यासाठी रुग्णांची गर्दी सरकारी रुग्णालयात दिसून येते. परंतु मुंबईतील केईएम, जेजे, नायर, कूपर, सायन अशा मोठ्या रुग्णालयातील डॉक्टर या संपात सहभागी झाले आहेत. या रुग्णालयाच्या बाहेर निवास डॉक्टरांनी आपले आंदोलन सुरू केले आहे. सायन, केईएम, जेजे रुग्णालयात ओपीडीवर परिणाम होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. 2 जानेवारीपासून संपावर जाणार असल्याचा इशारा मार्डने काही दिवसांपूर्वी दिला होता. तरीदेखील त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने त्यांनी संपावर ठाम राहत संप पुकारला आहे.

COMMENTS