केंद्रीय मंत्री, न्यायाधीश अणि पत्रकारांचे फोन टॅप : सुब्रमण्यम स्वामी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्रीय मंत्री, न्यायाधीश अणि पत्रकारांचे फोन टॅप : सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली /प्रतिनिधी : भाजपखे खासदार सुब्रमण्यम स्वामी नेहमीच त्यांच्या वक्तव्यांने चर्चेत असतात. केंद्रातील मोदी सरकारमधील काही मंत्री, राष्ट्रीय स

मुंबई महापालिकेतील सर्व पक्षांची कार्यालये केली सील
विशाल फटे सोलापूर ग्रामीण पोलिसांसमोर शरण | LOKNews24
महापालिका लेटलतिफ 14 अधिकार्‍यांवर कारवाई

नवी दिल्ली /प्रतिनिधी : भाजपखे खासदार सुब्रमण्यम स्वामी नेहमीच त्यांच्या वक्तव्यांने चर्चेत असतात. केंद्रातील मोदी सरकारमधील काही मंत्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, न्यायाधीश आणि काही पत्रकारांचे फोन टॅप केले जात असल्याचा दावा भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. सुब्रमण्यम यांच्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
स्वामी यांनी अनेक वेळेस मोदी सरकारवर टीका करून घरचा आहेर दिला आहे. मात्र थेट केंद्रीय मंत्र्यांचे फोन टॅपिंगसंदर्भात वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फोन टॅपिंग प्रकरणी आज संध्याकाळी वॉशिंग्टन पोस्ट एक अहवाल जाहीर करणार असल्याची माहिती समोर आलेली असल्याचे सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे. मोदी सरकारमधील मंत्री, आरएसएसचे नेते, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आणि पत्रकारांचे फोन टॅप करण्याचं काम इस्राईलस्थित स्पायवेअर कंपनी पेगाससला देण्यात आल्याबाबतचा एक अहवाल आज संध्याकाळी वॉशिंग्टन पोस्ट आणि लंडन गार्डियनच्या माध्यमातून प्रकाशित केला जाणार असल्याची जोरदार अफवा सध्या सोशल मीडियात आहे, असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करताच राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. फोन टॅपिंगच्या माध्यमातून केवळ सत्ताधारीच नव्हे, तर विरोधकांपैकी अनेक सदस्यांनाही लक्ष्य केलं जात आहे, असा रिप्लाय ओब्रायन यांनी केला आहे.

COMMENTS