Homeताज्या बातम्यादेश

गुलाम नबी आझाद स्वगृही परतण्याचे संकेत

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः गेल्या चार महिन्यापूर्वी काँगे्रसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत पक्षातून बाहेर पडलेले नेते गुलाम नबी आझाद यांनी स

कोरोनाने हिरावले ५७८ बालकांचे छत्र l पहा LokNews24
भाजप- शिवसेना युतीच्या दृष्ठीने आणखी एक पाऊल.. रामदास आठवलेंनी सांगितलं नवा फॉर्म्युला
अन्यायाची मालिका म्हणजे न्यायपालिका ?

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः गेल्या चार महिन्यापूर्वी काँगे्रसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत पक्षातून बाहेर पडलेले नेते गुलाम नबी आझाद यांनी स्वपक्ष स्थापन केला असून, या पक्षाद्वारे त्यांनी आगामी निवडणुका लढण्याची घोषणा केली होती. त्यासाठी त्यांनी अनेक सभा देखील घेतल्या होत्या. मात्र आझाद यांनी पुन्हा एकदा काँगे्रसमध्ये परतण्याचे संकेत दिले आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत ते पुन्हा काँग्रेसमध्ये सहभागी होऊ शकतात.

गुलाम नबी आझाद आणि काँग्रेस यांच्यात चर्चा सुरू असून लवकरच निर्णय होऊ शकतो. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत जोडो यात्रा पुढील महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचणार असून यादरम्यान गुलाम नबी आझाद यांना पक्षात पुन्हा प्रवेश दिला जाऊ शकतो. या वर्षी 26 ऑगस्ट रोजी आझाद यांनी काँग्रेससोबतचे त्यांचे 52 वर्ष जुने नाते तोडले आणि ते म्हणाले की, आता पक्ष आपल्या मार्गावरून भरकटत आहे आणि केवळ गुंडांकडे लक्ष दिले जात आहे. एवढेच नाही तर काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीसाठी त्यांनी राहुल गांधींना जबाबदार धरले होते. मात्र त्यांनी सोनिया गांधींचे कौतुक केले होते. काँग्रेस सोडल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी ऑक्टोबरमध्येच डेमोक्रॅटिक आझाद पार्टी या नावाने नवीन पक्ष स्थापन केला होता.

COMMENTS