Homeताज्या बातम्यादेश

सीबीएसईच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

15 फेबु्रवारीपासून दहावी, बारावीच्या परीक्षा

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च, तर बारावीच्या 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिल दर

समीर वानखेडे आमचा जावई नाही – चंद्रकांत पाटील (Video)
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 915 शॅडो मतदान केंद्र
कराड विमानतळाची जागाच शेतकर्‍यांना परत करा: डॉ. भारत पाटणकर

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च, तर बारावीच्या 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिल दरम्यान होतील. मंडळाकडून ललीश.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर केले आहे.
दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 2 ते 14 जानेवारी दरम्यान घेण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा वेळेवर पूर्ण करण्याचे आवाहन मंडळाकडून शाळांना करण्यात आले आहे. प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करण्यासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) आणि मार्गदर्शक तत्त्वं देखील जारी केली आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेला विद्यार्थी गैरहजर राहिल्यास निकालात विद्यार्थी गैरहजर असल्याचे नोंदवण्यात यावे आणि एखाद्या विद्यार्थ्याची प्रात्यक्षिक परीक्षा इतर कोणत्याही तारखेला घेतली जाणार असेल, तर त्याची ’अनुपस्थित’ ऐवजी ’रीशेड्यूल’ अशी नोंद केली जावी, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.साधारणपणे दोन्ही वर्गांमध्ये परीक्षेतील दोन प्रमुख विषयांमध्ये पुरेसे अंतर ठेवलेले आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या तारखा अशा प्रकारे निश्‍चित केल्या आहेत की, विद्यार्थ्यांच्या दोन विषयांच्या परीक्षा एकाच दिवशी नसतील. बारावीचे वेळापत्रक तयार करताना, जेईई मुख्य, एनईईटी आणि सीयुईटी युजी यासह इतर स्पर्धात्मक परीक्षांच्या तारखा एकसारख्या येणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.

COMMENTS