Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईमध्ये बेस्ट बसचालकाला मारहाण

मुंबई ः कांदिवली येथे बेस्ट बस अडवून चालकाला मारहाण करणार्‍या दुचाकीस्वाराला चारकोप पोलिसांनी अटक केली. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व चालकाल

कोरोनाची आता देशालाच धडकी ; महाराष्ट्रापाठोपाठ अन्य राज्यांतही बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ
श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |
पुरस्कार वापसी आणि संसदीय समिती ! 

मुंबई ः कांदिवली येथे बेस्ट बस अडवून चालकाला मारहाण करणार्‍या दुचाकीस्वाराला चारकोप पोलिसांनी अटक केली. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व चालकाला मारहाण केल्याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. नालासोपारा येथे वास्तव्यास असलेले भावेश पवार (32) बेस्ट उपक्रमात बसचालक म्हणून कामाला आहेत.

कांदिवली रेल्वे स्थानक-चारकोपदरम्यानच्या मार्गिकेवर ते बस चालवितात. नेहमी प्रमाणे बसने मीलन जंक्शन चौक येथून जात असताना एका दुचाकीस्वाराने बससमोर दुचाकी उभी केली. त्यामुळे पवार यांनी बस थांबवली असता त्या तरूणाने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याने दरवाजा उघडून भावेश यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. बसमधून त्याने खाली खेचले असता त्याचा गणवेशही फाटला. त्यावेळी तेथून जाणार्‍या पोलिसांनीही दुचाकीस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु दुचाकीस्वाराने पोलिसालाही धमकावले. तसेच त्यांची कॉलरही पकडली. या प्रकारानंतर नागरिकांनी तरुणाला पकडले आणि चारकोप पोलिस ठाण्यात नेले. तेथे पवार यांनी केलेल्या तक्रारीनंतर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी तरूणाला अटक केली.

COMMENTS