अमरावती/वृत्तसंस्था ः आंध्रप्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यातील कंदुकुरम येथे बुधवारी तेलगु देसम पार्टीचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू नायडूंच्या रोड-शो
अमरावती/वृत्तसंस्था ः आंध्रप्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यातील कंदुकुरम येथे बुधवारी तेलगु देसम पार्टीचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू नायडूंच्या रोड-शो दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी 7 जण मृत्यूमुखी पडले असून अनेक जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल होतोय.
नेल्लोर जिल्ह्यातील कंदुकुरमध्ये बुधवारी चंद्रबाबू नायडू यांचा रोड-शो होता. चंद्रबाबू नायडू यांच्या स्वागतासाठी पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक असे हजारो लोक सहभागी झाले होते. त्यावेळी चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. चंद्रबाबू नायडू यांनी दु:ख व्यक्त केलेय. चेंगराचेंगरीची घटना झाल्यानंतर चंद्रबाबू नायडू यांनी रोड शो अर्ध्यावर सोडून जखमींच्या भेटीसाठी रुग्णालय गाठले. तसेच मृतकांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रबाबू नायडू यांच्या कंदुकुरंम येथील रोड शोदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि हणामारी झाली. त्यावेळी तिथे चंगराचेंगरी झाली. यामध्ये 7 टीडीपी कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंद्रबाबू नायडू यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
COMMENTS