Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत 80 लाखांच्या बनावट नोटांसह तरूण अटकेत

मुंबई/प्रतिनिधी ः गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पवई येथे कारवाई करून 500 रुपयांच्या 16 हजार बनावट नोटा जप्त केल्या. बनावट नोटांची किंमत 80 लाख रुपये

रत्नागिरीत पुन्हा शाे करणार नाही – भरत जाधव
नवरा पाहिजेल तर पाच लाख दे….
आई-वडील शिक्षकांचे नाव उंचवा, हीच खरी कर्मवीरांना आदरांजली

मुंबई/प्रतिनिधी ः गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पवई येथे कारवाई करून 500 रुपयांच्या 16 हजार बनावट नोटा जप्त केल्या. बनावट नोटांची किंमत 80 लाख रुपये असून याप्रकरणी 31 वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. भारतीय बनावट चलनी नोटा व्यवहारात आणणार्‍या टोळीबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-10 च्या पोलीस हवालदार सतीश कांबळे यांना मिळाली होती. त्यानुसार पवई येथील साकीविहार परिसरातील आंबेडकर गार्डनजवळ पोलिसांनी सापळा रचला होता. त्यावेळी एक संशयीत व्यक्ती दुचाकीवरून तेथे आली. ती व्यक्ती लाल रंगाच्या बॅगेसह तेथे संशयीतरित्या वावरत असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी त्याच्याजवळील बॅग तपासली असता त्यात 500 रुपयांच्या बनावट नोटा असल्याचे आढळून आले. तपासणीत त्याच्याकडे 500 रुपयांच्या नोटांची 160 बंडले असल्याचे निष्पन्न झाले. प्रत्येक बंडलमध्ये 100 अशा 16 हजार नोटा बॅगेत होत्या. त्यांची किंमत 80 लाख रुपये आहे. आरोपीकडील बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी सौजन्य भूषण पाटील (31) याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात बनावट नोटा बाळगणे, त्या चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता त्याला 4 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

COMMENTS