Homeताज्या बातम्यादेश

उद्योजक वेणुगोपाल धूत यांना अटक

आयसीआयसीआय कर्ज घोटाळयात सीबीआयची कारवाई

नवी दिल्ली ः व्हिडिओकॉन कंपनीचे मालक वेणुगोपाल धूत यांना आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. आयसीआयसीआय बँकेकडून बेकायदेशी

महादेव जानकर यांचा झटका!
सोनसाखळी चोर १ लाखांच्या मुद्देमालासह अटकेत; न्यायालयाने दिली ४ दिवसांची पोलीस कोठडी
चौदा बालकांची विक्री करणार्‍या टोळी जेरबंद

नवी दिल्ली ः व्हिडिओकॉन कंपनीचे मालक वेणुगोपाल धूत यांना आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. आयसीआयसीआय बँकेकडून बेकायदेशीर कर्ज घेत आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात सीबीआयने कारवाई करत त्यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी याच प्रकरणात आयसीआयसीआय बँकेच्या माजी चेरयन चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांनाही सीबीआयने अटक केली आहे.


आयसीआयसीआय बँकेने 2012 मध्ये व्हिडिओकॉन कंपनीला 3250 कोटी कर्ज मंजूर केले होते. हे कर्ज नियमबाह्य देण्यात आल्याचा आरोप आहे. चंदा कोचर यांच्या हाती आयसीआयसीआय बँकेची सुत्रे असताना व्हिडिओकॉनला हे कर्ज देण्यात आले होते. या मोबदल्यात चंदा यांचे पती दीपक कोचर यांच्या न्यू रिन्यूएबलला व्हिडिओकॉनकडून गुंतवणूक मिळाली होती. आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन कंपनीला 2012 साली कर्ज दिले होते. त्यानंतर धूत यांनी हे कर्ज परत न केल्यामुळे बँकेने हे कर्ज एनपीएमध्ये टाकले होते. याशिवाय आयसीआयसीआय बँकेने कर्ज दिल्याने व्हिडिओकॉन कंपनीने सहा महिन्यांच्या आत दीपक कोचर यांच्या कंपनीला फंडिंग केले होते. त्यानंतर व्हिडिओकॉन आणि आयसीआयसीआय बँकेचे भागधारक अरविंद गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरबीआय आणि सेबीला पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. 2018 साली या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेच्या एमडीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्याच वर्षी या प्रकरणात तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली होती.

मुंबईच्या विशेष न्यायालयाने आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर व त्यांचे पती दीपक कोचर यांना 3 दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवले होते. चंदा व दीपक कोचर यांना अटक केली होती. व्हिडिओकॉन समुहाला रेग्युलेशनविरोधात जाऊन कोट्यवधी रुपयांचे कर्ज मंजूर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. चंदा कोचर यांच्यावर आरोप आहेत की, त्यांनी देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असणार्‍या आयसीआयसीआय बँकेची सुत्रे सांभाळल्यानंतर व्हिडिओकॉनच्या विविध कंपन्यांना 6 कर्ज मंजूर करण्यात आले. यापैकी 2 कर्ज प्रकरणे चंदा कोचर सदस्या असणार्या समितीने मंजूर केली होती. त्यांच्यावर व्हिडिओकॉन समुहाला कर्ज मंजूर करण्यासाठी अन्य समित्यांवर प्रभाव टाकल्याचाही आरोप आहे.

COMMENTS