Homeताज्या बातम्याविदेश

रशिया-युक्रेन युद्धविरामाचे संकेत

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन युक्रेनशी चर्चा करणार

मास्को/वृत्तसंस्था ः जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंघावत असतांना, विविध देशांवर आर्थिक संकट असतांनाच, रशिया-युक्रेन युद्ध परवडणारे नसल्यामुळ

त्र्यम्बकेश्वर येथे ज्ञानरचना सोशल फाउंडेशन तर्फे  सर्पदंश कार्यशाळा संपन्न
भारत सर्वाधिक शस्त्र आयात करण्यात अव्वल
संभाजीनगर मध्ये होणार्‍या पांढरे वाळ महामोर्चात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे- पत्रकार विष्णु राठोड

मास्को/वृत्तसंस्था ः जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंघावत असतांना, विविध देशांवर आर्थिक संकट असतांनाच, रशिया-युक्रेन युद्ध परवडणारे नसल्यामुळे ख्रिसमस संदेशात धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी रशिया-युक्रेन युद्ध संपविण्याचे आवाहन केले. यानंतर रशियन वृत्तवाहिनीशी बोलताना राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी आम्ही प्रत्येकाशी वाटाघाटी आणि चर्चा करण्यास तयार आहोत. आम्ही चर्चेस नकार देणार नाही; परंतू याबाबतचा निर्णय त्यांच्यावर अवलंबून आहे, असे स्पष्ट केले. पोप यांच्या आवाहनानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी चर्चेला दर्शवलेली तयारी महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
पुतीन यावेळी म्हणाले की, रशिया युक्रेनमध्ये अमेरिकेची घातक क्षेपणास्त्रे नष्ट करेल. युक्रेनमध्ये आम्ही योग्य दिशेने जात आहोत. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली पश्‍चिमेकडील देश रशियाला वेगळे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापूर्वी कीव्ह आणि त्यांच्या पाश्‍चात्य समर्थकांनी चर्चेत सहभागी होण्यास नकार दिला होता. मात्र संघर्षात सहभागी असलेल्या सर्व पक्षांशी चर्चा करण्यास रशिया तयार आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी रविवारी युक्रेनमधील युद्धावर आपल्या देशाच्या भूमिकेचा पुन्हा एकदा स्पष्ट केली. येत्या वर्षात चीन रशियाशी संबंध अधिक दृढ होतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. बीजीगमधील कॉन्फरन्समध्ये बोलताना वांग यांनी जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील संबंध बिघडल्याबद्दल अमेरिकेला जबाबदार धरले अमेरिकेचे चुकीचे चीन धोरण ठामपणे नाकारले आहे, असेही ते म्हणाले.

COMMENTS