Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पुन्हा हुडहुडी

अनेक जिल्ह्यात पारा 15 अंशांच्या खाली

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ पाहायला मिळाली होती. मात्र शनिवारपासून राज्यात ील विविध जिल्ह्यात थंडी जाणवा

वारकर्‍यांच्या संतापानंतर सुषमा अंधारेंची माफी
झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्त्यांची दर्जोन्नती करून हस्तांतरित करा
अतिवृष्टीगस्त शेतकर्‍यांना तात्काळ भरपाई द्या ः आमदार काळे

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ पाहायला मिळाली होती. मात्र शनिवारपासून राज्यात ील विविध जिल्ह्यात थंडी जाणवायला लागली आहे. काल विविध जिल्ह्यात कमाल तापमानात मोठी घट झाल्याचे पहायला मिळाले. अनेक भागात पारा पुन्हा 15 अंशांच्या खाली गेला आहे.काडकाच्या थंडीमुळे ग्रामीण भागासह शहरातही शेकोट्या पेटायला सुरुवात झाली आहे.

उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाच्या उत्तर भागात किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच राज्यभरात पुढील दोन दिवस हुडहुडी जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याने परभणीत राज्यातील नीचांकी 10.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर मुंबईत देखील यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर मराठवाड्यासह विदर्भ पश्‍चिम महाराष्ट्रात तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. नाशिकच्या तापमानात कमालीची घट झाली आहे. निफाडमध्ये 7.5 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. कालच्या तुलनेत तापमानात आज 3.7 अंश सेल्सिअसची घट झाली आहे. 24 तासांत निफाडच्या तापमानात मोठी घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यांत प्रचंड थंडी जाणवत असून दोन दिवसांपासून सकाळी बाहेर निघणे देखील कठीण झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात थंडीची तीव्रता अधिक जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट निर्माण झाल्याने ग्रामीण भागासह शहरांमध्ये शेकोट्या मोठ्या प्रमाणात पेटवल्या जात आहेत. रब्बी हंगामाच्या पिकासाठी प्रकल्पातून पाणी सोडल्या जात असल्यामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. पुन्हा एकदा थंडी वाढण्याची शक्यता आहे. परभणी गायब झालेल्या थंडीचे पुनरागमन झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून परभणीत थंडीचा कडाका कायम आहे. सलग तीन दिवस परभणीचे तापमान हे 10 अंशावर होते. या थंडीमुळं ग्रामीण भागासह शहरात शेकोट्या पेटत असून नागरिक उबदार कपड्यांचा वापर करताना दिसत आहेत.

COMMENTS