Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खोट्या सह्या प्रकरणी मनसे रायगड जिल्हा महिला अध्यक्षांवर गुन्हा दाखल  

नवी मुंबई प्रतिनिधी - शेतजमिनीवर बांधकाम करण्यासाठी बिनशेत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सहीचा आणि शिक्क्यांचा वापर करणाऱ्या

Bhivandi : बॉयफ्रेण्डसोबत राहण्यासाठी पतीच्या हत्येची सुपारी l LokNews24
रणवीर सिंगसोबत ‘डॉन ३’मध्ये दिसणार प्रियांका चोप्रा
दिवा स्टेशनमध्ये रणरागिनीं रोखून धरली लोकल

नवी मुंबई प्रतिनिधी – शेतजमिनीवर बांधकाम करण्यासाठी बिनशेत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सहीचा आणि शिक्क्यांचा वापर करणाऱ्या मनसेच्या महिला रायगड जिल्हाध्यक्षा आदिती सोनार विरोधात खान्देश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेलच्या विहिघर परिसरा हा प्रकार घडला असून शेतजमिनीवर रहिवासी बांधकाम करण्यात आले होते. त्यासाठी शेतजमीन बिनशेत केल्याचे आदेश असल्याचे भासवले जात होते. त्यासंदर्भात रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीनंतर चौकशी केली असता शेतजमिनीला बिनशेती करण्यासाठी देण्यात आलेल्या आदेश पत्रावर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची बनावट सही व शिक्का असल्याचे आढळून आले आहे. पोलीस उपायुक्त आणि तक्रारदार यांनी अधिक माहिती दिली.

COMMENTS