Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पैगंबरांच्या अपमानचा बदला घेण्यासाठीच उमेश कोल्हेंची हत्या

राष्ट्रीय तपास यंत्रणेचा आरोपपत्रात दावा

मुंबई : अमरावतीतील उमेश कोल्हेंची हत्या तबलिगी जमातच्या कट्टरपंथीयांनी पैगंबरांच्या अपमानचा बदला घेण्यासाठी केली होती, असा हा महत्वपूर्ण दावा

लव जिहादच्या निषेधार्थ नगरमध्ये रस्ता रोको    
मनोज जरांगेंचं आजपासून आमरण उपोषण सुरु
घाटकोपरमध्ये गुजराती पाट्यांची तोडफोड

मुंबई : अमरावतीतील उमेश कोल्हेंची हत्या तबलिगी जमातच्या कट्टरपंथीयांनी पैगंबरांच्या अपमानचा बदला घेण्यासाठी केली होती, असा हा महत्वपूर्ण दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आरोपपत्रात केला आहे.
भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून अमरावतीतील मेडिकल व्यावसायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेखला अटक करण्यात आले आहे. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्यास सांगितले होते हे समोर आले आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र तब्बल 12 दिवसांच्या तपासानंतर अमरावती शहर पोलीसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात आरोप पत्र दाखल केले आहे.


दरम्यान एनआयएकडून आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये इरफान खान (32), मुदस्सर अहमद उर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (22), शाहरुख पठाण उर्फ बादशाशा हिदायत खान (25), अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तस्लीम (24), शोएब खान उर्फ भुर्या साबीर खान (22), अतीब रशीद आदिल रशीद (22), युसूफ खान बहादूर खान (44) यांचा समावेश आहे. सदर हत्या प्रकरणात 11 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 120 बी, 302, 341, 153 अ, 201 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती एनआयएने दिली आहे.

COMMENTS