Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लहान मुलांचा शोषण केल्या प्रकरणी आमदार नारायण कुचे व भाजप कार्यकर्त्यावर कारवाई करण्याची मागणी 

जालना प्रतिनिधी - जालना बदनापूर येथे पाकिस्तानचे मंत्री बिलावल भुट्टो यांच्या विरोधात केलेल्या निषेध आंदोलनात लहान मुलांचा शोषण केल्याबद्दल आ

आमदार बंब आणि बीआरएसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
ईडीचे पुणे आणि छ. संभाजीनगरमध्ये छापे
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला खिंडार

जालना प्रतिनिधी – जालना बदनापूर येथे पाकिस्तानचे मंत्री बिलावल भुट्टो यांच्या विरोधात केलेल्या निषेध आंदोलनात लहान मुलांचा शोषण केल्याबद्दल आ. नारायण कुचे व इतर सहकाऱ्यांवर चाईल्ड प्रोटेक्शन अक्टनुसार कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या सचिवांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनात, भाजपच्या वतीने बिलावल भुट्टो विरोधात निषेध आंदोलनात भाजपा कार्यकर्त्यांनी एका चार ते पाच वर्षाच्या मुलांच्या लिंग हाती घेऊन त्याला लघुशंका करण्यास दबाव आणला. या लहान मुलावर दडपण आणण्याचा विडिओ अनेक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी आंदोलनकर्ते आमदार नारायण कुचे व इतर सहकाऱ्यांवर चाईल्ड  प्रोटेक्शन ऑक्टचा कायदान्वे कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.पाकिस्तानचे मंत्री बिलावल भुट्टो यांनी जे वक्तव्य केले त्याचा आम्ही निषेध करतो. मात्र, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जे कृत्य केले ते अतिशय घृणास्पद असून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

COMMENTS