Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात एमपीएससीच्या नव्या पॅटर्नविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

नवा पॅटर्न 2025 पासून लागू करण्याची केली मागणी

पुणे : राज्यसेवा वर्णनात्मक मुख्य परीक्षा पद्धती ही 2025 पासून लागू करण्यासाठी पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी हे आक्रमक झाले आहेत. हा नवा पॅटर्न 2

43 वर्षांनंतर पुन्हा भरली कोतुळची शाळा
बहुजन समाज पार्टीच्यावतीने इफ्तार पार्टी
25 टक्के अग्रीम पिक विमा तात्काळ मंजुर करुन शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करा -शिवाजी ठोंबरे

पुणे : राज्यसेवा वर्णनात्मक मुख्य परीक्षा पद्धती ही 2025 पासून लागू करण्यासाठी पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी हे आक्रमक झाले आहेत. हा नवा पॅटर्न 2025 पासून लागू करण्याच्या मागणीसाठी नवी पेठेतील अहिल्या शिक्षण संस्थेसमोर त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्‍या एमपीएससीच्या विविध पदांच्या परीक्षेतील मुख्य परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरुपात न घेता वर्णनात्मक स्वरुपात घेण्याचा निर्णय पुढील वर्षापासून घेण्यात आला आहे. या परीक्षेच्या बदलास एमपीएससीच्या परीक्षांची तयारी करणार्‍या पुण्यातील विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवत सोमवारी सकाळपासून पुण्यातील शास्त्री रोडवरील अहिल्यादेवी अभ्यासिके समोरील रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरु केले. तब्बल 700 ते 800 विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच ठिय्या दिला असून आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे. अचानक सुरू केलेल्या आंदोलनांनी पोलिस प्रशासनाची धावपळ उडाली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना सांगितले की, आतापर्यंत एमपीएस्सीकडून वस्तुनिष्ठ स्वरुपात परीक्षा घेण्यात येत होती. परंतु माजी आयएसएस अधिकाऱी चंद्रकांत दळवी यांच्या समितीने दिलेल्या शिफारशीनुसार विद्यार्थ्यांना एमपीएस्सीची मुख्यपरीक्षा आता वस्तुनिष्ठ एवजी वर्णनात्मक पध्दतीने द्यावी लागणार आहे. हा बदल सन 2023 पासून लागू करण्यात येणार असल्याचे एमपीएससीने सांगितले आहे. परंतु लगेच हे बदल करणे आम्हास अशक्य असल्याने हा बदल 2025 पासून करण्यात यावा अशी आमची मागणी आहे. तसेच एमपीएस्सीच्या परीक्षेत वारंवार चुकीचे प्रश्‍न येतात आणि त्यात नंतर बदल करण्यात येतात. त्यामुळे सातत्याने अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊन गुणात फरक पडत असल्याने. बिनचूक पेपर काढण्यात यावे अशी आमची मागणी आहे. कोरोनामुळे दोन वर्ष एमपीएस्सी परीक्षा होऊ शकल्या नाही. त्यानंतर दीड वर्षातच तीन वर्षाच्या परीक्षा एकापाठोपाठ घेण्यात आल्या असून मुलाखत आणि मुख्य परीक्षा बाकी आहे. अशावेळी तात्काळ परीक्षेतील बदल योग्य नाही असे विद्यार्थी म्हणाले.

COMMENTS