Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दरवाजा उघडता उघडता…पायाजवळची पर्स झाली गायब

सव्वा लाखाचे दागिने केले लंपास, पोखर्डीतील घटना

अहमदनगर/प्रतिनिधी ः घराच्या दरवाजाचे कुलूप उघडताना महिलेने तिच्याकडील सव्वा लाख रुपये किमतीचे दागिने असलेली पर्स पायाजवळ ठेवली व ती कुलूप उघडत अस

तीन पिढ्या श्रमदान करताना पाहून आनंद वाटला ः जिल्हाधिकारी सालीमठ
राजकीय पक्ष मतदाना पुरताच जनतेचा वापर करतात – प्रा.डॉ.मच्छिंद्र सकटे
जिल्हाधिकाऱ्यांचे धडक कारवाईमुळे पाथर्डीतील सहा दुकानाला लागले सील

अहमदनगर/प्रतिनिधी ः घराच्या दरवाजाचे कुलूप उघडताना महिलेने तिच्याकडील सव्वा लाख रुपये किमतीचे दागिने असलेली पर्स पायाजवळ ठेवली व ती कुलूप उघडत असता पाठीमागून आलेल्या चोरट्याने दागिन्यांसह पर्स चोरून नेली. ही घटना नगर तालुक्यातील पोखर्डी शिवारातील भैरोबा मंदिराच्या मागे घडली.


याबाबतची माहिती अशी की, सुवर्णा वागळे (वय 45, राहणार भैरोबा मंदिराच्या मागे, पोेखर्डी, तालुका नगर) या त्यांच्या काही कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. बाहेरील काम आटोपून त्या घरी आल्या आल्यावर त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप उघडण्याकरिता त्यांनी त्यांच्या खांद्याला असलेली पर्स खाली पायाजवळ ठेवली. त्या पर्समध्ये दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व दीड तोळे वजनाचे सोन्याचे त्रिकोणी मिनी गंठण होते. या दागिन्यांसह त्यांनी पर्स खाली ठेवली व त्या कुलूप उघडत असताना अचानक पाठीमागून एकाने येऊन त्यांच्या पायाजवळ ठेवलेली पर्स उचलून चोरून नेली. पर्स घेऊन पळताना रस्त्याच्या काही अंतरावर मोटारसायकलवर थांबलेल्या त्याच्या सहकार्‍याच्या मोटारसायकलवर तो बसून ते दोघे चोरटे पसार झाले.


याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी चोरट्यांविरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 379 34 अन्वये चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस नाईक आव्हाड करीत आहेत. या घटनेने पोखर्डी शिवारात खळबळ उडाली आहे.

COMMENTS