Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोमय्या, दरेकरानंतर प्रसाद लाड यांना क्लीन चीट

मुंबई महापालिकेच्या कंत्राटात फसवणूक प्रकरणात होता गुन्हा दाखल

मुंबई/प्रतिनिधी ः आयएनएस विक्रांत प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांना आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चीट दिल्यानंतर शनिवारी भाजप नेते प्रसाद लाड

सरकार, काॅलेजियम आणि संघर्ष !
मिस इंडिया रायझिंग स्टार 2023 अ‍ॅट ताज किताबने सातारची कु. स्नेहल चांगण सन्मानीत
महिलांच्या कौतुकाने अजितदादा झाले भावुक… डोळ्यात आले अश्रू…

मुंबई/प्रतिनिधी ः आयएनएस विक्रांत प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांना आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चीट दिल्यानंतर शनिवारी भाजप नेते प्रसाद लाड यांना एका फसवणूकीच्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चीट दिली आहे. मुंबई महापालिकेच्या एका कंत्राटात फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे आमदार प्रसाद लाड आणी इतर आरोपींविरोधात 2014 मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या गुन्हाचा तपास बंद करण्यात यावा अशी मागणी करणारा सी समरी अहवाल मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने अतिरिक्त महानगरदंडाधिकारी न्यायालयात सादर केला आहे.
आर्थिक गुन्हे शाखेकडून दिलासा मिळालेले लाड हे किरीट सोमय्या आणि प्रवीण दरेकर यांच्यानंतर तिसरे भाजप नेते आहेत. 2009 मध्ये महापालिकेच्या घाटकोपर विभागाने जलवाहिनी देखभाल, संरक्षणासाठी दोन वर्षांचे कंत्राट देण्यासाठी निविदा जारी केल्या होत्या त्यावेळी बीव्हीजी लिमिटेड आणी प्रसाद लाड यांची क्रिस्टल ट्रेडकॉम या दोन कंपन्यांनी एकत्र येऊन त्यासाठी निविदा भरल्या. या दोन्ही कंपन्यांनी भागिदारी करार करत बीव्हीजी क्रिस्टल जाईंट व्हेंचर ही कंपनी स्थापन केली. तसेच प्रत्यक्ष काम करण्यासाठी अग्रवाल यांची निवड करण्यात आली.  कामाच्या एकूण रकमेच्या पाच टक्के रॉयल्टी बीव्हीजी व क्रीस्टल या दोन कंपन्यांना मिळेल, असे या करारामध्ये नमूद करण्यात आले होते. या कंपनीची निविदा पालिकेने मंजूर केली.  तसेच कामाच्या खर्चाचे दीडशे कोटींचे कंत्राटही मंजूर केले. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मोबदलाच मिळाला नसल्याची तक्रार अग्रवाल यांनी दाखल केली होती. या प्रकरणी  प्रसाद लाड आणी इतर आरोपींविरोधात 2014 मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणात आता प्रसाद लाड यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  या गुन्हाचा तपास बंद करण्यात यावा अशी मागणी करणारा सी समरी अहवाल मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने अतिरिक्त महानगरदंडाधिकारी न्यायालयात सादर केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून दिलासा मिळालेले लाड हे किरीट सोमय्या आणि प्रवीण दरेकर यांच्यानंतर तिसरे भाजप नेते आहेत.

नेमके प्रकरण काय ?
2009मध्ये महापालिकेच्या घाटकोपर विभागाने जलवाहिनी देखभाल, संरक्षणासाठी दोन वर्षांचे कंत्राट देण्यासाठी निविदा जारी केल्या होत्या. त्यावेळी बीव्हीजी लि. व प्रसाद लाड यांची क्रिस्टल ट्रेडकॉम या दोन कंपन्यांनी एकत्र येऊन त्यासाठी निविदा भरल्या. या दोन्ही कंपन्यांनी भागिदारी करार करत बीव्हीजी क्रिस्टल जाईंट व्हेंचर ही कंपनी स्थापन केली. तसेच प्रत्यक्ष काम करण्यासाठी अग्रवाल यांची निवड केली. कामाच्या एकूण रकमेच्या पाच टक्के रॉयल्टी बीव्हीजी व क्रीस्टल या दोन कंपन्यांना मिळेल, असे या करारामध्ये नमूद करण्यात आले होते. या कंपनीची निविदा पालिकेने मंजूर केल्या तसेच कामाच्या खर्चाचे दीडशे कोटींचे कंत्राटही मंजूर केले. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर लाड आणि अन्य आरोपींनी आपली फसवणूक करत मोबदला दिला नाही, अशी तक्रार अग्रवाल यांनी केली होती.

COMMENTS