पारंपारीक शेतीला फाटा देत केला ड्रॅगन फ्रुट शेतीचा यशस्वी प्रयोग 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पारंपारीक शेतीला फाटा देत केला ड्रॅगन फ्रुट शेतीचा यशस्वी प्रयोग 

अकोला प्रतिनिधी - वातावरणात होणाऱ्या बदलामुळे पारंपरिक शेती परवडत नसल्याने शेतकरी आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करीत आहेत‌.तर गेल्या दहा ते पंधरा

स्वामित्व योजनेमुळे अनेकांच्या जीवनात बदल : पंतप्रधान मोदी
राहुरी तालुक्यात वडनेर येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू 
राजारामबापू कारखाना निवडणूक बिनविरोध; संचालक मंडळात 14 नवे चेहरे

अकोला प्रतिनिधी – वातावरणात होणाऱ्या बदलामुळे पारंपरिक शेती परवडत नसल्याने शेतकरी आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करीत आहेत‌.तर गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून राज्यातील शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. तर आता अकोला जिल्हातल्या वाडेगावातील शिक्षकाने शिक्षकी पेशा सांभाळुन ड्रॅगन फ्रुट शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. ड्रॅगन फ्रुट हे फळ अनेक आजारांवर व त्वचेसाठी गुणकारी असून राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात त्याचे उत्पादन घेत आहेत.तर अमेरिकतील वाळवंटातील या फळाची आता देशासह राज्यातील अनेक भागात शेती केली जात आहे..महाराष्ट्रातील शेतकरी जवळपास गेल्या 10 ते 15 वर्षांपासून ड्रॅगन फ्रुटची शेती करत आहेत.तर बाळापुर तालुक्यातील वाडेगावात लिंबूसह, कांदा सोयाबीन, तूर,हरभरा आदी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.मात्र आता येथील प्राथमिक शिक्षक सचिन भास्कर लोखंडे यांनी ड्रॅगन फ्रुटची लागवड करून पारंपरिक शेतीला फाटा दिला आहे.पेशाने शिक्षक असलेले सचिन लोखंडे यांच्याकडे 14 एकर शेती असून त्यांनी एका एकरात सीताफळ तर अर्ध्या एकरात ड्रॅगन फ्रुटचा यशस्वी प्रयोग केला आहे.त्यानी ड्रॅगन फ्रुट व सीताफळाच्या बागेमध्ये आंतरपिक म्हणून हरभरा पिकाची लागवड केली आहे.तर सध्या त्यांच्या बागेतील रोपे चार ते पाच फूट उंचीपर्यंत वाढली असून ती रोपे दोन वर्षीची झाली असून त्यांना आता उत्पादन सुरू झाले आहे. तर येणाऱ्या दिवसात आपल्याला चांगले उत्पादन होईल अशी आशा त्यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

वाडेगाव येथील सचिन लोखंडे हे एका प्रायव्हेट शाळेत प्राथमिक शिक्षक असून आपला शिक्षकी पेशा सांभाळत त्यांनी शेती कडे तेवढंच लक्ष दिल असून ड्रॅगन फ्रुट च्या शेती सोबत त्यांनी हरबऱ्याच आंतर पीक घेतलं आहे.

COMMENTS