समृध्दी महामार्गावर गाडीला लागली भीषण आग 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृध्दी महामार्गावर गाडीला लागली भीषण आग 

औरंगाबाद प्रतिनिधी- समृध्दी महामार्गावर बुलढाण्यावरून पुण्याला जात असताना वैजापूर तालुका हद्दीत गलांडे वस्ती जवळ गाडीने अचानक पेट घेतला,यावेळी गाडीती

 शहरातील परिस्थिती शांत आहे, अफवावर विश्वास ठेवू नये – आस्तिक कुमार पांडे  
छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारका समोरच केली आत्महत्या
केसीआरची ऑफर स्वाभिमानीच्या राजू शेट्टींनी नाकारली
औरंगाबाद प्रतिनिधी- समृध्दी महामार्गावर बुलढाण्यावरून पुण्याला जात असताना वैजापूर तालुका हद्दीत गलांडे वस्ती जवळ गाडीने अचानक पेट घेतला,यावेळी गाडीतील प्रवश्यांनी गाडीतून वेळेचं पळ काढल्याने या घटनेत कुठलीही जीवित हानी झालेली नाही,याबाबत अधिक माहिती अशी की नितींसिंग राजपूत वय ४१ रा.शांती अपार्टमेंट इंद्रायणी नगर,भोसरी पुणे हे आपल्या परिवारासोबत बुलढाणा येथून समृध्दी महामार्गाणे शिर्डी मार्गे पुण्याला आपल्या गाडी क्र.एम.एच 14 ईयु 7939 ने जात असताना वैजापूर शिवारात गलांडे वस्ती जवळ अचानक त्याना गाडीतून वायर जाळण्याचा वास आला ज्यामुळे त्यांनी रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून तपासणी करू लागले तितक्यात त्यांच्या गाडीने अचानक पेट घेतला ज्यामुळे त्यांनी गाडीत असलेल्या नितीन राजपूत(४७),दिशा राजपूत(४१),राजेश राजपूत(५०),सुरेश राजपूत(६२) यांना गाडीतून बाहेर काढले,बघता बघता पूर्ण गाडीने पेट घेतला, व घडी जळून  खाक झाली,वेळेचं गाडीतील प्रवाशी बाहेर पडल्याने या दुर्घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही

COMMENTS