Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. सुहास पळशीकर यांचा भाषा समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा

पुणे/प्रतिनिधी ः कोबाड गांधी यांच्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम या अनघा लेले यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाला पुरस्कार जाहीर केल्यानंतर काही तासांतच हा

’नमामि गोदावरी’ प्रकल्पाला गती द्या ः आ. सत्यजीत तांबे
किरीट सोमय्या हल्लात झाले रक्तबंबाळ | LOK News 24
राजकीय पक्षांची चिन्हेही गोठवली जावीत…राळेगण सिद्धीच्या बैठकीत ठराव

पुणे/प्रतिनिधी ः कोबाड गांधी यांच्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम या अनघा लेले यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाला पुरस्कार जाहीर केल्यानंतर काही तासांतच हा पुरस्कार राज्य सरकारने रद्द केल्यानंतर साहित्यिकांत संताप व्यक्त होत असून, भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर गुरुवारी ज्येष्ठ लेखक आणि राजकीय विचारवंत डॉ. सुहास पळशीकर यांनी देखील राजीनामा दिला आहे.


ऐकीव माहिती आणि पूर्वग्रह यांच्या आधारे शासनाने रद्द करणे ही घटना म्हणजे शासन वैचारिक स्वातंत्र्य आणि मतभिन्नता यांचा आदर करीत नाही याचा संकेत आहे, अशी भूमिका स्पष्ट करून पळशीकर यांनी राजीनामा दिला आहे. राज्य शासन जे साहित्यविषयक पुरस्कार देते त्यापैकी एका जाहीर झालेल्या पुरस्काराचा निर्णय अलीकडेच शासनाने रद्द केला आहे. ही बाब मला अनुचित वाटते. शासनाच्या तज्ज्ञ समित्या आणि अभ्यास गट यांना स्वायत्तता नसेल तर अशा यंत्रणांच्या मार्फत चांगले काम होणे अवघड आहे असे मला वाटते. अनुवादासाठी पुरस्कार मिळालेल्या पुस्तकाचा पुरस्कार केवळ ऐकीव माहिती आणि पूर्वग्रह यांच्या आधारे शासनाने रद्द करणे ही घटना म्हणजे शासन वैचारिक स्वातंत्र्य आणि मतभिन्नता यांचा आदर करीत नाही याचा संकेत आहे, अशी भूमिका स्पष्ट करून पळशीकर यांनी भाषा सल्लागार समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.

COMMENTS