Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऑनलाईन वाइन खरेदी करणार्‍या तरुणीची 97 हजारांची फसवणूक

पुणे ः पुण्यातील कल्याणीनगर परिसरात राहणार्‍या एका 25 वर्षीय तरुणीने ऑनलाइन वाइन खरेदी करण्याच्या नादात तब्बल 97 हजार रुपयांची फसवणूक धक्कादायक प

बेड उपलब्धतेसाठी नोडल अधिकारी नियुक्त
Buldhana : सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रम संपन्न | LOKNews24
सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवा

पुणे ः पुण्यातील कल्याणीनगर परिसरात राहणार्‍या एका 25 वर्षीय तरुणीने ऑनलाइन वाइन खरेदी करण्याच्या नादात तब्बल 97 हजार रुपयांची फसवणूक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार तीन अज्ञात बँक खातेधारक व मोबाईल धारकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरचा प्रकार दहा डिसेंबर रोजी रात्री घडला आहे. संबंधीत तक्रारदार तरुणी हिने ऑनलाईन वाइन खरेदी करण्यासाठी गुगलवर सर्च केले होते. त्यानुसार एका मोबाईल क्रमांकावर तरुणीने फोन केला असता, फोनवरील इसमाने तिला ऑनलाइन पेमेंटच्या बहाण्याने खोटी बतावणी करुन तिच्या डेबीट कार्डची गोपनीय माहिती व युपीआय ट्रान्झेक्शनची रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करण्यास सांगितली. त्यानंतर तिच्या संमती शिवाय परस्पर तिच्या बँक खात्यावरुन भामटयाने 97 हजार रुपये ऑनलाईन दुसरीकडे अनाधिकृतरित्या ट्रान्सफर करुन तिची आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबत येरवडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) यु.चक्रे पुढील तपास करत आहे.


दरम्यान, दुसर्‍या एका प्रकारात  पुणे महानगरपालिकेत क्लार्क पदावर नोकरी लावतो असे खोटे सांगुन दोन भामटयांनी दोन तरुणांची दोन लाख 86 हजार रुपयांची फसवणुक केली आहे. याप्रकरणी आरोपी शोभा विजय सुर्यवंशी (रा.रविवार पेठ,पुणे) व सतिश वसंत लालबिगे (रा.कसबा पेठ,पुणे) यांचेवर खडक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनिकेत अनिल मेंढे (34,रा.गुरुवार पेठ,पुणे) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. आरोपींनी मेंढे यांना नोकरी लावण्याचे खोटे आश्‍वासान देऊन त्यांच्याकडून एक लाख 56 हजार रुपये घेतले. परंतु त्यास नोकरीस न लावता त्याची फसवणुक करण्यात आली. अशाचप्रकारे मनपात शिपाई पदावर नोकरीस लावतो असे म्हणून आरोपींनी तुकाराम भगवान जावळे या तरुणाची एक लाख 26 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

COMMENTS