Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अतिवृष्टीची भरपाई न दिल्यास जलसमाधी घेणार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा; जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी - अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर हेक्टरी 40 हजार रूपयांची मदत जमा करावी, अन्यथा 21 डिसेंबरला राह

मुख्यमंत्री शिंदेंकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा वारसा ः औताडे
कोपरगावात डॉ. आंबेडकरांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी
खुले नाट्यगृहाचे काम कधी पूर्ण होणार ?

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी – अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर हेक्टरी 40 हजार रूपयांची मदत जमा करावी, अन्यथा 21 डिसेंबरला राहुरीच्या मुळाधरणात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. अन्यथा 21 डिसेंबरला राहुरीच्या मुळाधरणात जलसमाधी घेतली जाईल हा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि मोरे यांनी दिला आहे. अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले.


                   प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,राहुरी तहसीलदार फसिओद्दीन शेख यांच्या आदेशानुसार मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामविकास अधिकारी यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून 11 सप्टेंबरला पंचनामे पुर्ण केले होते. मात्र 33 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान होऊन देखील जिल्ह्यातील शेतकरी शासनाच्या नुकसान भरपाई यादीत आलेला नाही. अतिवृष्टीत नुकसान  झालेल्या शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असल्याने शेतकर्‍याला नुकसान भरपाई देऊन दिलासा देण्याची गरज आहे. येत्या 20 डिसेंबरपर्यंत नगर जिल्ह्यातील शेतपिकाचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर हेक्टरी 40 हजार रूपयांची मदत द्यावी, अन्यथा 21 डिसेंबरला राहुरीच्या मुळाधरणात जलसमाधी घेतली जाईल, हा इशारा जिल्हाध्यक्ष रवि मोरे यांनी दिला आहे. अप्पर जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या सांगितले आहे. निवेदनावर जुगल गोसावी, योगेश करपे, सुनिल इंगळे, किशोर मोरे, सतिष पवार, प्रविण पवार, प्रमोद पवार, सचिन पवळे, संदिप शिरसाठ, प्रसाद धुमाळ, बाळासाहेब निमसे, ज्ञानेश्‍वर निमसे, कैलास गोसावी यांच्या सह्या आहेत.

COMMENTS