Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापुरुषांची बदनामीच्या निषेधार्थ  हमाल कष्टकऱ्यांनी बाजार समितीसमोर केले निदर्शने

  औरंगाबाद प्रतिनिधी - एका बाजूला देशातील व राज्यातील सामान्य कष्टकरी जनता महागाई - बेरोजगारी - भ्रष्टाचाराने त्रस्त असताना, ज्यांचे वैचारिक शिदोरी

Aurangabad : महिला अत्याचारा विरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन (Video)
केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांची वाळूज औद्योगिक नगरीत भेट
जालना रोड राहणार सात तास बंद

  औरंगाबाद प्रतिनिधी – एका बाजूला देशातील व राज्यातील सामान्य कष्टकरी जनता महागाई – बेरोजगारी – भ्रष्टाचाराने त्रस्त असताना, ज्यांचे वैचारिक शिदोरी मुळे या बहुजन, दलित – आदिवासी,  भटके – विमुक्त, महिला व असंघटित कष्टकर्याना, शिक्षण, आत्मसन्मान, सामाजिक न्याय व सुरक्षेची व्दारे खुली झाली , त्याच महापुरुषांची जाणीवपूर्वक बदनामी मूठभर सत्ताधारी मंडळी करीत आहेत यात शंकाच नाही जाति – धर्माचे नावाने गोरगरीबात सतत संशयाचे वातावरण निर्माण करून, त्यांच्यात फूट पाडण्याचे मोठे षडयंत्र उभे केले जात आहे. या सर्व कष्टकऱ्यांच्या जगण्याचा आधार असलेले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योति सावित्री बाई फुले, लोकराजा शाहू महाराज, भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, पद्मभूषण विठ्ठल रामजी शिंदे इ ……महापुरूषांची बदनामी कदापी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा साथी सुभाष लोमटे यांनी दिला आहे. 

COMMENTS