Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भंडारदरा येथे वन्यजीव विभागाच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर उत्साहात

अकोले/प्रतिनिधी- कळसूबाई-हरिश्‍चंद्रगड वन्यजीव विभाग व आस्वस प्रतिष्ठान व इंडियन मेडिकल असोसिएशन देवळाली कॅम्प  यांच्या संयुक्त विद्यमाने  भंडार

वरखेड यात्रेनिमित्त तहसील कार्यालयात नियोजन बैठक उत्साहात
अतिवृष्टीगस्त शेतकर्‍यांना तात्काळ भरपाई द्या ः आमदार काळे
दुसर्‍यांच्या वेदना वाटून घेण्याइतके दुसरे पुण्य नाही

अकोले/प्रतिनिधी- कळसूबाई-हरिश्‍चंद्रगड वन्यजीव विभाग व आस्वस प्रतिष्ठान व इंडियन मेडिकल असोसिएशन देवळाली कॅम्प  यांच्या संयुक्त विद्यमाने  भंडारदरा येथवआरोग्य शिबिराचे आयोजन  करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 728 हुन अधिक रुग्णांनी सहभाग नोंदवला या शिबिरासाठी नाशिक येथील 60 डॉक्टर ची टीम उपस्थिती होती शिबिरांमध्ये अस्थिरोग सांधेवात मेंदू रोग नेत्ररोग तसेच कॅन्सर सारख्या रोगांवर उपचार करण्यात आले.


 विशेष म्हणजे पुढील औषधऔपचार व ऑपरेशन बाबत सर्व उपचार मोफत करणार असल्याचे डॉ. कानडे यांनी सांगितले.शिबिरामध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णाची चहा नाष्ट्याची व्यवस्था वन विभागाच्या वतीने करण्यात आली होती. उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर पार पडले. डॉ.अनिल कानडे डॉ. मीरा जाधव डॉ. रेणुका देशपांडे  डॉ. नितीन नार गोलकर कोल्हापूर हे उपस्थित होते. वन्यजीव विभागाच्या वतीने अभयारण्यात राहणारे आदिवासी व्यक्तींचे चांगले आरोग्य मिळावे हाच प्रमुख उद्देश असल्याने आम्ही आरोग्य शिबिर आयोजित केले असल्याचे नाशिक वन विभागाचे सहाय्यक वनरक्षक अधिकारी गणेश रणदिवे यांनी सांगितले.  अभयारण्यात आदिवासी बांधव अतिशय खडतर जीवन जगत असतात आरोग्याच्या बाबतीत या नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन वनविभागाचे अधिकारी अमोल आडे यांनी सांगितले. वनरक्षक अधिकारी दत्तात्रय पडवळे यांनी शिबिरासाठी येणार्‍या प्रत्येक रुग्णाची चौकशी करून विचारपूस करत होते शिबिर व्यवस्थित पार पाडण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे वनपाल रवींद्र सोनार,भास्कर कुठे ,शंकर लांडे, राजेंद्र चव्हाण, संजय गीते, चंद्रकांत तळपाडे महेंद्र पाटील, मनीषा सरोदे, दिवे, पिचड, मुठे, पाटील यांच्यासह वन विभागाचे कर्मचार्‍यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी राजूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस गणेश इंगळे यांनी भेट दिली.

COMMENTS