कर्जत/प्रतिनिधी : जमीन घेण्यासाठी आई वडिलांकडून 3 लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त क

कर्जत/प्रतिनिधी : जमीन घेण्यासाठी आई वडिलांकडून 3 लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा कर्जत पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील हिंगणगाव येथे ही घटना घडली आहे.
या प्रकरणी दादा भिवा कुंडकर, रा. चिखली, ता. श्रीगोंदा यांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, राणी शंकर कोळेकर वय : 22 वर्षे यांचा 22 महिन्यांपूर्वी शंकर संजय कोळेकर, रा. हिंगणगाव यांच्यासोबत विवाह झाला. त्यानंतर पतीसह कुटुंबियांकडून राणी कोळेकर यांना जमीन घेण्यासाठी 3 लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देवून मारहाण करण्यात आली. या छळाला कंटाळून राणी कोळेकर यांनी सोमवारी (दि. 12) 4 वाजेच्या सुमारास गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी पती शंकर संजय कोळेकर, सासरे संजय कोळेकर, सासु मुक्ताबाई संजय कोळेकर, आजेसासु सुमनबाई कोळेकर, सर्व रा. हिंगणगाव, ता. कर्जत यांच्याविरुद्ध कलम 304 (ब), 306, 498 (अ), 323, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शंकर कोळेकर, संजय कोळेकर, मुक्ताबाई कोळेकर यांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित हे पुढील तपास करीत आहेत.
COMMENTS