Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रामकुमार शेडगे यांना वेस्ट बंगाल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट डायरेक्टर पुरस्कार

मसूर / वार्ताहर : मसूर येथील रामकुमार शेडगे यांनी दिग्दर्शित केलेल्या तसेच द डार्क शॅडो मोशन पिक्चरची निर्मिती असलेल्या ’द ट्रॅप’ वेब सिरीजला व

महिला धोरणाच्या मसुद्यावर अधिवेशनात चर्चा व्हावी : ना. रामराजे नाईक-निंबाळकर
पुणे प्रादेशिक विभागात एकाच दिवशी दोन कोटींच्या वीजचोर्‍या उघडकीस
पश्‍चिम महाराष्ट्रातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित; 5 लाख 60 हजार ग्राहकांना पुनर्वीज जोडणी संधी

मसूर / वार्ताहर : मसूर येथील रामकुमार शेडगे यांनी दिग्दर्शित केलेल्या तसेच द डार्क शॅडो मोशन पिक्चरची निर्मिती असलेल्या ’द ट्रॅप’ वेब सिरीजला वेस्ट बंगाल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये ’लाईव्ह अ‍ॅक्शन’ कॅटेगरीमध्ये बेस्ट डायरेक्टर म्हणून पुरस्कार मिळाला आहे. या प्रसंगी बोलताना रामकुमार शेडगे म्हणाले, या पुरस्कासाठी माझी निवड केल्याबद्दल वेस्ट बंगाल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल व ज्यूरी चेअरपर्सन क्लारा हॉफमन व फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष योगेश बारस्कर यांचे आभार मानले.
थरारक आणि रहस्यमय कथेवर आधारित ‘द ट्रॅप’ वेब सीरीज आहे. शहरातील नाईटलाईफची संस्कृती मोठ्या प्रमाणात तरुणांना आकर्षित करत असून त्यात तरुणाईचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. या नाईटलाईफमध्ये पबिंग, पार्टी करणे आणि मस्ती करणे हा तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. नाईटलाईफ संस्कृतीच्या चक्रव्ह्यूहात एक तरुणी अडकते आणि पुढे होणारा मानसिक व सामाजिक त्रासाला तोंड द्यावे कशे लागते यावर वेब सीरिजमध्ये पहायला मिळणार आहे.
अभिनेत्री जानकी आर, त्याचबरोबर रामकुमार शेडगे, आशुतोष भोसले, केतन पेंडसे, संदीप मोरे, अमोल भगत अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. आकाश भापकर हे कॅमेरामन असून लेखक-दिग्दर्शक रामकुमार शेडगे आहेत. ही रोमांचकारी आणि रहस्यमय वेब सिरीज लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

COMMENTS