Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तालुक्याच्या सर्वांगीण विकास वाटचालीत भक्कम उभे राहा – आमदार थोरात

संगमनेर प्रतिनिधी - अडचणीतून मार्ग काढत मोठ्या कष्टातून संगमनेर तालुक्याने प्रगती साधली आहे .येथील सहकार व विकास हा राज्याला आदर्शवत ठरला आहे. सध

सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस प्रत्यक्षात मदत नाही – काँग्रेस नेते आमदार थोरात
चिमुकल्यांच्या वारीसाठी आ. थोरातांचा ताफा थांबतो तेव्हा.
मविआला 180 पेक्षा जास्त जागा मिळणार

संगमनेर प्रतिनिधी – अडचणीतून मार्ग काढत मोठ्या कष्टातून संगमनेर तालुक्याने प्रगती साधली आहे .येथील सहकार व विकास हा राज्याला आदर्शवत ठरला आहे. सध्या संकटकाळ असला तरी प्रत्येकाने आपली जबाबदारी मनापासून पार पाडत  तालुक्याच्या विकासाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे रहा असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.


सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहावर अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, अ‍ॅड. माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात ,राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ, आर.बी. राहणे आदी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हा एक परिवार आहे .तालुक्याच्या यशामध्ये सर्वांचा वाटा असल्याने संगमनेर हा राज्यात दिमाखाने उभा आहे. निळवंडेचे पाणी दुष्काळी भागाला देणे हे आपले जीवनाचे ध्येय आहे. अनंत अडचणीवर मात करून निळवंडे धरण आपण पूर्ण केले. बोगद्यांची कामे मार्गी लावली. मात्र 2014 ते 19 काळात कालव्यांची  कामे थंडावली होती. 2019 नंतर पुन्हा कालव्याच्या कामाला मोठी गती दिली. मोठा निधी मिळवला. रात्रंदिवस काम सुरू होते. ऑक्टोबर 2022 मध्येच दुष्काळी भागातील शेतकर्‍यांच्या शेतात निळवंडे चे पाणी देण्यासाठी आपण काम सुरू ठेवले होते. मात्र जूनमध्ये सत्तांतर झाले आणि कालव्यांची कामे थांबली. निळवंडे च्या कालव्यांची काम बंद करणे म्हणजे दुष्काळग्रस्तांच्या अन्नात माती कालवण्यासारखे आहे. मात्र हे कालव्यांची कामे लवकरात लवकर झाली पाहिजे. निळवंडेचे पाणी दुष्काळग्रस्तांच्या शेतात गेले पाहिजे यासाठी आपला कायम आग्रह राहणार आहे. तालुक्याच्या पाणी लढया संदर्भात हरिश्‍चंद्र फेडरेशनचे मोठे काम आहे. तर शेतकी संघाने आपला लौकिक निर्माण केला आहे. बँकिंग क्षेत्र सध्या अवघड झाले असून सर्व सहकारी संस्था या अत्यंत पारदर्शकपणे व देशाला आदर्शवत काम करत आहेत. म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जबाबदारी यशस्वी पार पडून तालुक्याच्या विकास वाटचालीत भक्कम आणि उभे रहा असे आवाहन केले.

COMMENTS