भ्रष्ट अधिकार्‍यांकडून पैसे घेऊन बोठेने दिली जरे हत्येची सुपारी? : रुणाल जरेचा दावा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भ्रष्ट अधिकार्‍यांकडून पैसे घेऊन बोठेने दिली जरे हत्येची सुपारी? : रुणाल जरेचा दावा

अहमदनगर/प्रतिनिधी-भ्रष्ट अधिकार्‍यांकडून पैसे घेऊन दैनिक सकाळचा कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे याने यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या

रुणाल जरे याच्या अंगरक्षकाला दमबाजी l Rekha Jare Hatyakand l Bal Bothe I LOK News 24
आईच्या आठवणीत होता प्रत्येक क्षण…; रुणाल जरेने व्यक्त केली भावना ; न्याय मिळवून देण्याचा निर्धारही व्यक्त
जरे हत्याकांडातील आरोपी बोठेच्या पत्नीने धमकावले…;संबंधितांवर कारवाई करण्याची रुणाल जरेंची पोलिस अधीक्षकांकडे मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी-भ्रष्ट अधिकार्‍यांकडून पैसे घेऊन दैनिक सकाळचा कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे याने यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी दिली असावी, असा संशय जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने व्यक्त केली असून, या प्रकरणाची चौकशी 15 दिवसात झाली नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.
रेखा जरे हत्याकांड प्रकरणी मुख्य सूत्रधार बाळ बोठे यास आर्थिक सहकार्य (खंडणी) करणार्‍या शासकीय अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रुणाल जरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मंगळवारी निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणी येत्या 15 दिवसात चौकशी करून कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषण सुरु करेन, असा इशारा जरे यांनी यात दिला आहे. बाळ बोठे याने ज्या अधिकार्‍यांविरुध्द आईच्या (रेखा जरे) लेटरपॅडवर निवेदने दिले तसेच दैनिक सकाळ या वर्तमानपत्रात मोठया बातम्या छापल्या व या अधिकार्‍यांनी बाळ बोठे यास पैसे देऊन माझी आई रेखा जरे यांना गप्प बसविण्यास सांगितले. मात्र, आईने गप्प न बसता त्यांच्या प्रकरणांच्या चौकशीचा पाठपुरावा चालू ठेवला, त्याच अधिकार्‍यांकडून पैसे घेऊन बाळ बोठे याने आईंच्या हत्येची सुपारी दिली असावी, असे मला वाटते. त्यामुळे या अनुषंगाने या प्रकरणाचा तपास करून दोषी अधिकार्‍यांंवर गुन्हे दाखल व्हावेत, असे जरे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बाळ बोठे याने काही शासन अधिकार्‍यांच्या भ्रष्ट कारभार व भ्रष्टाचाराविरोधात रेखा जरे यांच्या लेटरपॅडवर निवेदने दिली होती. ही निवेदने दिल्यानंतर तो त्याची दैनिक सकाळ या वर्तमानपत्रामध्ये मोठी बातमी छापत असे व या अधिकार्‍यांना धमकावत असे. तसेच या अधिकार्‍यांना बोठे हा रेखा जरे यांची भीती घालत असे. त्यामुळे हे अधिकारी यावरुन बोठेसोबत तडजोडी करत असत, हे मला आईच्या हत्येनंतर चौकशी व चर्चेतून समजले आहे, असेही रुणाल जरे यांनी या निवेदनात नमूद केले आहे.

भ्रष्टाचाराविरोधात आईचा लढा
रेखा जरे या यशस्विनी महिला ब्रिगेड या संस्थेच्या संस्थापक-अध्यक्षा होत्या. त्या या संघटनेच्या माध्यमातून समाजकार्य करीत होत्या. तसेच गैरप्रकारांना आळा घालत भ्रष्टाचारविरोधात लढत होत्या. याच दरम्यान त्यांची दैनिक सकाळचा कार्यकारी संपादक बाळ बोठे याच्याशी ओळख होऊन मैत्री झाली. दरम्यान त्या सामाजिक कार्य करत असताना त्यांनी अनेक प्रकारच्या शासकीय कार्यालयातील गैरकारभाराविरोधात आवाज उठविला होता, असेही रुणाल जरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

COMMENTS