पुणतांबा प्रतिनिधी ः पोलिसांनी कापूस चोरताना एका चोरट्याला पकडले असून पुणतांबा मध्ये चोरट्यांनी आता कापूस चोरण्याचा नवा फंडा उभारला असून एका आरोप
पुणतांबा प्रतिनिधी ः पोलिसांनी कापूस चोरताना एका चोरट्याला पकडले असून पुणतांबा मध्ये चोरट्यांनी आता कापूस चोरण्याचा नवा फंडा उभारला असून एका आरोपीला अटक केल्यामुळे गावातील चोरांचा तपास लागण्याची शक्यता असून गावातील प्रलंबित चोरांचा तपास जलद गतीने लावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत राहता पोलीस आपण समजली माहिती अशी की, स्टेशन रोड लगत असलेल्या कापूस खरेदी केंद्रात साठवलेल्या कापूस करताना पुणतांबा पोलिसांनी एका चोरट्याला जेरबंद केले.
मंगळवारी रात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान पोलिस गस्त घालत असताना स्टेशन रोडवरील विष्णू भाऊसाहेब डोके यांच्या कापूस खरेदी केंद्राच्या दुकानात काही हालचाली असल्याचे काही संशयास्पद व्यक्ती त्या ठिकाणी असल्याचे त्यांच्या लक्षात येतात पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन एका चोरट्याला अटक केली. चोरटे गावातीलच असून पोलिसांच्या दक्षतेमुळे कापूस भरून चोरून नेण्याचा प्रयत्न होता तो पोलिसांच्या दक्षतेमुळे फसला गेला. स्टेशन रोडवर गेल्या अनेक वर्षापासून व्यापार्यांची दुकाने फोडून चोर्या झाल्या आहेत. त्याचा तपास अद्याप लागलेला नाही. एका चोरट्याला अटक केल्यामुळे गावातील पुढील चोर यांचा तपास लागण्याची शक्यता आहे. पुणतांबा पोलिस स्टेशनचे अशोक झिने व त्यांच्या सहकार्यांनी चोरट्याला पकडल्यामुळे त्यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे तसेच गावातील प्रलंबित चोरांचा तपास लवकरात लवकर लावा अशी मागणी व्यापारी वर्गाने केली आहे.
COMMENTS