Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांचा विखेंच्या कार्यक्रमावर बहिष्कार

खा. लोखंडेंना डावलल्याचा करणार निषेध

अहमदनगर प्रतिनिधी - राज्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री व भाजपचे उपमुख्यमंत्री आहेत. मात्र, स्थानिक स्तरावर बाळासाहेबांची शिवसेना प

जिल्हा दुष्काळमुक्तीसाठी स्व. बाळासाहेब विखेंनी सातत्याने संघर्ष केला
पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वावर जनतेचा विश्‍वास ः ना. राधाकृष्ण विखे पाटील
धरणांतील उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करा

अहमदनगर प्रतिनिधी – राज्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री व भाजपचे उपमुख्यमंत्री आहेत. मात्र, स्थानिक स्तरावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला भाजप विचारात घेत नसल्याचे दिसू लागले आहे. श्रीरामपूर पंचायत समितीत आज शुक्रवारी (9 डिसेंबर) पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत नळपाणी पुरवठा योजना व शॉपिंग सेंटर इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. मात्र, या कार्यक्रमास बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांना डावलल्याचा आरोप करून या कार्यक्रमावर आम्ही बाळासाहेबांची शिवसेना पक्ष बहिष्कार टाकून जाहीर निषेध करीत असल्याचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील देवकर व संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार यांनी जाहीर केले आहे.


यासंदर्भात जिल्हा प्रमुख देवकर यांनी सांगितले की, श्रीरामपूर पंचायत समितीने दुटप्पीपणा केला आहे. केंद्र शासन पुरस्कृत नळ पाणी पुरवठा योजनेचे श्रीरामपूर तालुक्यातील योजनांचे भूमिपूजन पालक मंत्र्यांच्या हस्ते ठेवण्यात आले आहे. पण, खरे तर ही योजना केंद्राची आहे व खासदार लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली या योजनेचे भूमिपूजन करायला हवे होते. पण, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हातील एकमेव खासदार असलेले सदाशिव लोखंडे यांची वेळ न घेता परस्पर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम युतीचा आहे व त्यामुळे पालकमंत्र्यांनी दिलेली वेळ म्हणजे सर्वच लोकप्रतिनिधींची वेळ असा अर्थ होत नाही. सरकारमध्ये बाळासाहेबांची शिवसेनाही आहे, हे मुद्दाम विसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न पालकमंत्री यांच्याकडून होत आहे, असा स्पष्ट आरोपही देवकर यांनी केला आहे.


अधिकार्‍यांना दिला इशारा – मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे आहेत, हे अधिकार्‍यांनी लक्षात ठेवावे. पालकमंत्र्यांच्या हातचे बाहुले झालेल्या अधिकार्‍यांनी हे ध्यानात घ्यावे. या जिल्ह्यात प्रशासनाला वेठीस धरून चुकीचा पायंडा पाडला जात आहे. त्यामुळे अधिकार्‍यांच्या मुख्यमंत्र्यांकडे रितसर तक्रारी आम्ही करणार आहोत. या कार्यक्रमावर आम्ही बाळासाहेबांची शिवसेना पक्ष बहिष्कार टाकून जाहीर निषेध करीत असल्याचे जिल्हाप्रमुख देवकर व संपर्क प्रमुख पवार यांनी जाहीर केले आहे.

COMMENTS