नाना पटोले यांचे घूमजाव ; माझ्या वक्तव्याचा विपर्यास

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाना पटोले यांचे घूमजाव ; माझ्या वक्तव्याचा विपर्यास

नागपूर/मुंबई : काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अलीकडच्या काही दिवसांत सातत्याने चर्चेत असून, त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्र

पुण्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक : अजित पवार
राज्यात महाविकास आघाडी असताना काँग्रेस- राष्ट्रवादीत आरोपांच्या फैरी… विनयभंगाचा गुन्हा
सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय थांबवा ; उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे थेट पंतप्रधान मोदी यांना साकडे

नागपूर/मुंबई : काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अलीकडच्या काही दिवसांत सातत्याने चर्चेत असून, त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा धक्कादायक आणि गंभीर आरोप केला होता. मात्र यावर खुलासा करतांना पटोले यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. आपले आरोप हे राज्य सरकारवर नसून केंद्र सरकारवर असल्याचा त्यांनी म्हटले आहे.
लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले म्हणाले की, स्वबळाची घोषणा केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. कुठेतरी आपल्याला पिंजर्‍यात आणण्याचा प्रयत्न करणार, असाही आरोप यावेळी त्यांनी केला आहे. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केले आहे. सत्तेत सोबत असले तरी मुख्यंत्रीपद उद्धव ठाकरे, गृहमंत्रीपद त्यांच्याकडे (दिलीप वळसे-पाटील) आहे, त्यामुळे ते मला सुखाने जगू देणार नाहीत, असेही म्हटले आहे. दुष्मनाला मारायचे असेल तर घरात घुसून मारावा लागतो. आपण ही पावले उचलल्यास दुष्मन पहिले आपले घर वाचवेल, तुमच्या घरावर लक्ष ठेवणार नाही, असे पटोले यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहायला लागली आहे. हे त्यांना माहिती आहे. राजकीय परिस्थिती, कुठं आंदोलन यांचा रिपोर्ट द्यावा लागत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे, हे त्यांना कळत नाही. कुठं ना कुठं ते आपल्याला पिंजर्‍यात आणण्याचा प्रयत्न करणार. आणू दया, कर नाही त्याला डर कशाला, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली.
नाना पटोलेंच्या या आरोपांना नवाब मलिक यांनी उत्तर दिले आहे. मलिक म्हणाले की, नाना पटोले यांनी जे आरोप त त्यांच्या अपुर्ण माहितीच्या आधारे केले आहेत. कुठलंही सरकार असेल तरी अशा पद्धतीने माहिती गृहखाते संकलित करत असते. सुरक्षेच्या दृष्टीने राजकीय नेत्यांच्या दौर्‍यांवर लक्ष असते. हे आताच होते असे नाही. सुरक्षा यंत्रणा अलर्ट करण्यासाठी हे प्रत्येक सरकारमध्ये होते. नाना पटोले यांनी त्यांच्या पक्षातील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून माहिती घ्यावी. त्यांनी माहिती न घेतल्याने असे आरोप करत आहेत, असा हल्ला बोल नवाब मलिक यांनी केला आहे.

आघाडीला सुरुंग लावण्याचा प्रकार : अजित पवार
नाना पटोले यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याच्या केलेल्या आरोपांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार संतप्त झाले असून, त्यांनी पटोले यांचे आरोप खोडून काढले आहेत. तसेच अजित पवार यांनी याबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे संताप व्यक्त केला आहे. अशा आरोपांमुळे महाविकास आघाडीला सुरुंग लागत असल्याची भावनाही अजित पवार यांनी व्यक्त केली.

COMMENTS