Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव येथे दिवसाढवळ्या चोरी

श्रीगोंदा प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथे महिला घरी  एकटीच असल्याचे पाहून सोन्याच्या दागिन्याला पॉलिश करून देतो या बहाण

मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं निधन l LokNews24
पाथर्डीतील घुमटवाडी येथे चक्क पाण्याची चोरी
राष्ट्रवादी चित्रपट, कला, साहित्य व सांस्कृतिक सेलच्या जिल्हा सरचिटणीसपदी रियाज पठाण

श्रीगोंदा प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथे महिला घरी  एकटीच असल्याचे पाहून सोन्याच्या दागिन्याला पॉलिश करून देतो या बहाण्याने महिलेच्या कानातील कर्णफुले व हाताच्या बोटातील अंगठी घेऊन मोटारसायकल वर पसार झालेल्या मोहम्मद तबारक(30) व अरियन गुप्ता वय (27) या दोन परप्रांतीय तरुण इराणीना ग्रामस्थांनी पकडून बेदम चोप देऊन श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिले.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथे कुकडी वसाहती जवळ अनिल सबाजी घोडके हे कुटुंबासह राहतात.ते बाहेरगावी नोकरीस असल्याने त्यांच्या पत्नी निकिता अनिल घोडके घरी एकट्याच असल्याचे पाहून सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास  मोहम्मद तबारक(30) व अरियन गुप्ता वय (27) रा.तुलसीपुर सबुनी, जिल्हा-भागलपुर बिहार हे दोन इराणी तरुण यांनी आम्ही तुमच्याकडे असलेल्या सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो, सोने पुर्वी पेक्षा एकदम नवीन करून देतो असे गोड बोलून सदर महिलेच्या कानातील कर्णफुले व हाताच्या बोटातील अंगठी असा सुमारे एक तोळे सोन्याचा50हजार रुपयांचा ऐवज विश्‍वास ठेवून सदर महिलेने काढुन दिला.व त्यातील एका भामट्याने सदर महिलेस गप्पा मारण्यात नादवले तर दुसर्‍या भामट्याने जवळ असलेल्या पाण्याच्या डब्यात सोन्याचे दागिने टाकले.व महिलेची नजर चुकवून पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने डब्यात टाकलेले दागिने गुपचुप काढून घेतले व डबा बंद केला.सदर महिलेस डबा अर्ध्या तासाने उघडा दागिने नविन झालेले असतील असे सांगितले व पैसे न घेताच त्यांच्याकडे असलेली सी.बी.झेड कंपनीची एम.एच 12 इ व्ही.7230 या मोटारसायकलवर पोबारा केला. सदर महिलेस संशय आल्याने डबा उघडला असता डब्यात फक्त पाणीच दिसले दागिने आढळून आले नाही.तिने तात्काळ पुतण्या मंगेश घोडके यांस फोन द्वारे घडलेला प्रकार सांगितला. मंगेशने तात्काळ आपल्या मित्रांना फोन करून घटनेची माहिती दिली असता मित्रांनी लोणी व्यंकनाथ चौकात या दोन इराणी भामट्यांना पकडून त्याची झाडा झडती घेतली असता त्यांच्याकडे कानातील कर्णफुले व अंगठी मिळून आल्याने यांना बेदम चोप देऊन श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली.त्यांनी तात्काळ गाडी पाठवून दोन भामट्याना ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे.निकिता अनिल घोडके यांच्या फिर्यादी वरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS