Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्युत ठेकदार 51 हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडला

देवळाली प्रवरा येथील घटना ; 15 ऐवजी 40 एचपी लोडसाठी लाचेची मागणी

देवळाली प्रवरा प्रतिनिधी - देवळाली प्रवरा येथील एका व्यवसायासाठी वीज वितरण कंपनीकडून कनेक्शन घेतलं होतं. मात्र त्याच व्यवसायासाठी कनेक्शनमधून जास

कोपरगाव शहरावर लक्ष केंद्रित करून जास्तीत तपासण्या करा – ना. बाळासाहेब थोरात
कर्जत उपविभागीय क्षेत्रात अवैध व्यवसायांना कुणाचा आशिर्वाद ?
नगर अर्बनच्या माजी संचालकांना खा. डॉ. विखेंचा पाठिंबा

देवळाली प्रवरा प्रतिनिधी – देवळाली प्रवरा येथील एका व्यवसायासाठी वीज वितरण कंपनीकडून कनेक्शन घेतलं होतं. मात्र त्याच व्यवसायासाठी कनेक्शनमधून जास्त लोड द्यावा यासाठी देवळाली प्रवरा येथील महावितरणाचा खासगी ठेकेदारास 51 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहात पकडण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती  अशी की, सुधीर भास्कर पठारे (वय 34 वर्ष, व्यवसाय महावितरण खासगी ठेकेदार, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी. जिल्हा. अहमदनगर) असे या खासगी लाचखोर ठेकेदाराचं नाव आहे. याप्रकरणी त्याच्याविरुध्द राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महावितरणाचा खासगी ठेकेदार सुधीर पठारे याने तक्रारदाराला दि. 3 डिसेंबर रोजी 1लाख 2 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी लाचेच्या रकमेच्या अर्धी रक्कम म्हणजे 51 हजार रुपये काम सुरू करण्यापूर्वी 5 डिसेंबर रोजी घेतली.यातील तक्रारदार यास त्याच्या व्यवसायाकरिता वापरात असलेल्या वीज कनेक्शनचा 15  एचपी वरून 40 एचपी लोड वाढवून देण्याच्या मोबदल्यात यातील ठेकेदार सुधीर पठारे यानेे वैयक्तिक ओळखीचा फायदा घेतला. स्वत:च्या आर्थिक फायद्यापोटी तक्रारदार यास वीज कनेक्शन भार वाढवून देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करून ती पंच साक्षीदार यांच्या समक्ष स्वीकारली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राहुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करुन महावितरणाचा खाजगी ठेकेदार पठारे यास अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र पोलिस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक एन. एस. न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक संदीप घुगे, पोलिस निरीक्षक श्रीमती गायत्री जाधव यांच्यासह पोलीस हवालदार एकनाथ बाविस्कर, पोलीस नाईक प्रकाश महाजन, पो. ना. राजेंद्र गीते, पोलिस हवालदार संतोष गांगुर्डे आदींच्या पथकाने हि कार्यवाही करण्यात आली.

त्या छाप्याबाबत उलट सुलट चर्चा! – दरम्यान लाचेच्या जाळ्यात खासगी ठेकेदाराबरोबर देवळाली प्रवरा येथील महावितरण कार्यालयात काम करणारा एक कनिष्ठ अभियंत्यांचा या प्रकरणात समावेश असल्याची चर्चा सोमवारी सायंकाळ पासून देवळाली प्रवरा  व राहुरी फॅक्टरी परिसरात सुरू होती. नव्हे नव्हे तर संबधित अधिकार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधात्मक पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती चर्चेतून पुढे आली होती. मात्र या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सुधीर पठारे या ठेकेदारावरच गुन्हा दाखल झाल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.

COMMENTS