Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर

नवी दिल्ली ः  महाराष्ट्रातील शिवसेनेच्या दोन गटातील सत्ता संघर्षावर 7 डिसेंबर रोजी प्रस्तावित असलेली सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सरन्य

‘आनंदाचा शिधा’ चा 97 टक्के शिधापत्रिकाधारकांनी घेतला लाभ
मासिक पाळीच्या त्रासामुळे १४ वर्षीय मुलीची आत्महत्या
अर्थसंकल्पातील विकासाची पंचसूत्री राज्याला प्रगतीपथावर नेईल : ना. मंत्री जयंत पाटील यांचा विश्‍वास

नवी दिल्ली ः  महाराष्ट्रातील शिवसेनेच्या दोन गटातील सत्ता संघर्षावर 7 डिसेंबर रोजी प्रस्तावित असलेली सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सरन्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्त्वातील 5 सदस्यीय पीठापैकी एक न्यायमूर्ती बुधवारी उपलब्ध नसल्याचे ही सुनावणी टाळण्यात आलीय. याप्रकरणी पुढील सुनावणी आगामी 13 जानेवारी 2023 रोजी घेण्याचे ठरले आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील प्रकरण ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उद्या न्या कृष्ण मुरारी उपलब्ध होणार नसल्याने सुनावणी होऊ शकणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नोटीसद्वारे स्पष्ट केले. शिवसेना नेमकी कोणाची..? या मुद्यावरून गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अंधेरी पोटनिवडणुकीआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवून शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना वेगळी नावे आणि चिन्हे दिली. तो निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही योग्य ठरविला. त्यानंतर ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यासंबधी याचिका दाखल केली होती. याच संदर्भात 29 नोंव्हेंबर रोजी सुनावणी होणार होती. परंतु तेव्हाही ही सुनावणी लांबणीवर पडली होती. यावेळी ठाकरे गटाकडून वैधानिकदृष्या हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे असताना आणि महाराष्ट्रातील सरकारच्या वैधतेवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित झालेले असताना यावर तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात पुढील सुनावणी 13 जानेवारीला होईल असे स्पष्ट केले आहे. आगामी 13 जानेवारीला मुख्य सुनावणीच्या वेळापत्रका संदर्भात निर्णय घेतला जाईल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

COMMENTS