Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी – दीपक महाराज देशमुख

अकोले प्रतिनिधी - पत्रकारांनी आपल्या जीवनात सातत्याने लोकहिताची कामे करताना होणार्‍या धावपळीबरोबरच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे,अस

सोमैयाच्या अक्षय आव्हाडची ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी’ निवड
अक्षय मातंग यांची सहाय्यक कक्ष अधिकारी या पदावरील नियुक्तीने सन्मान
शासकीय औद्योगिक संस्थेत विद्यार्थ्यांनी गिरवले योगाचे धडे

अकोले प्रतिनिधी – पत्रकारांनी आपल्या जीवनात सातत्याने लोकहिताची कामे करताना होणार्‍या धावपळीबरोबरच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे,असे प्रतिपादन अगस्ति देवस्थान ट्रस्टचे विश्‍वस्त हभप दीपक महाराज देशमुख यांनी केले. मराठी पत्रकार परिषद व मेडीकव्हर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर येथे अकोले तालुक्यातील पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी उदघाटक म्हणून हभप दीपक महाराज देशमुख बोलत होते.


 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक,मुक्त पत्रकार शांताराम गजे होते. या शिबिरात अकोले तालुक्यातील 27 पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. हभप दीपक महाराज देशमुख पुढे म्हणाले की-निर्माण झालेली दवाखाने आरोग्य बिघडल्यावरती उपचार करण्यासाठी निर्माण झालेली नाहीत तर त्यापूर्वीच आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने त्यांचा उपयोग होत असतो. लोकशाही व्यवस्थेतील  चौथा स्तंभ म्हणून आपण माध्यमांकडे पाहत आलेलो आहोत. माध्यमांच्याद्वारे समाजाच्या विकासाच्या प्रक्रियेला गती देण्याबाबत आपली सामाजिक, सांस्कृतिक ,राजकीय व्यवस्था अधिक उत्तम करण्याचा प्रयत्न पत्रकारांच्या द्वारे होत असतो. पत्रकार हा समाजाचे कान आणि डोळे आहेत. त्यामुळे त्यांनी अधिक उत्तम आरोग्य संपन्न राहणे ही समाजाची गरज आहे. त्यादृष्टीने मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने राबविलेला उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. यावेळी मेडिकव्हर हॉस्पिटलचे सेंटर हेड डॉ.जयेश साळुंके, ऑपरेशन मॅनेजर डॉ.दर्शन चकोर,वैद्यकीय संचालक डॉ.शिवम गुप्ता, न्यूरोसर्जन डॉ. प्रमोद गांगुर्डे, जनरल फिजिशियन डॉ. सुशांत गीते, मार्केटिंग मॅनेजर दिपक जाधव, फॅसेलिटी मॅनेजर श्रीकृष्ण चंदनकर, आरएमओ डॉ.शिवानी आवचार, असोसिएट मार्केटिंग संतोष गोडसे आदी तज्ज्ञ डॉक्टर व ज्येष्ठ पत्रकार शांताराम गजे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अमोल वैद्य यांनी केले. सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार प्रकाश आरोटे यांनी केले तर आभार प्रा. चंद्रशेखर हासे यांनी मानले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, हेमंत आवारी, रामलाल हासे, अल्ताप शेख, अजय जाजू, संदीप वाकचौरे, सुनिल नवले, सचिन जंत्रे, श्रीनिवास रेणूकदास, राजू जाधव, गणेश आवारी, आबासाहेब मंडलिक, प्रशांत देशमुख, संदीप दातखिळे, ज्ञानेश्‍वर खुळे, भाऊसाहेब वाकचौरे, अण्णा थोरात, अमोल मतकर, अमोल पवार, रवी नेहे, छायाचित्रकार दिनेश जोरवर आदी पत्रकार उपस्थित होते.

COMMENTS