नवी दिल्ली प्रतिनिधी - काँगे्रसकडून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर रविवा
नवी दिल्ली प्रतिनिधी – काँगे्रसकडून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर रविवारी काँगे्रसच्या झालेल्या बैठकीत आगामी रणनीती ठरवण्यात आली. भारत जोडो यात्रेनंतर देशभरात ’हाथ से हाथ जोडो अभियानाची काँग्रेसने घोषणा केली आहे. त्यामुळे काँगे्रसला पुन्हा एकदा बळ मिळणार आहे. काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे की, ’भारत जोडो यात्रे’नंतर 26 जानेवारीपासून देशभरात ’हाथ से हाथ जोडो अभियान’ सुरू करणार आहे. या प्रचारासाठी पक्ष ब्लॉक, पंचायत आणि बूथ स्तरावर जनसंपर्क करणार आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस सुकाणू समितीची बैठक बोलावली. ज्यात त्यांनी सर्व पदाधिकार्यांना आपापल्या जिल्ह्यांचा हिशेब मागितला आणि कोणत्याही परिस्थितीत जनतेसाठी काम करावे लागेल असे सांगितले. या बैठकीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, अशोक गेहलोत यांच्यासह अनेक बडे नेते सहभागी झाले होते. या बैठकीत पक्षाबाबत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यासोबतच प्रियांका गांधी यांच्यावरही मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. खर्गे यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुकाणू समितीची ही पहिलीच मोठी बैठक होती. या बैठकीनंतर 26 जानेवारीच्या सुमारास भारत जोडो यात्रा श्रीनगरला पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर 26 जानेवारीपासून ’हाथ से हाथ जोडो’ मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या वेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीत उपस्थित सर्व सरचिटणीस आणि प्रभारी यांना स्थानिक पातळीवर झालेल्या बदलांबाबत प्रश्न विचारले. तुम्ही दौरे करता का? तुम्हाला स्थानिक समस्या माहित आहेत का? अशाप्रकारचे प्रश्न खर्गेंनी केले. तसेच, यावेळी खर्गे यांनी भारत जोडो यात्रेबाबतही चर्चा केली. या प्रवासाला रविवारी 88 दिवस पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रवासाला आता राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप आले आहे. महागाई, बेरोजगारी, आर्थिक-सामाजिक विषमता, द्वेषाच्या राजकारणाविरोधात आंदोलन असल्याचे त्यानी सांगितले.
प्रियंका गांधी करणार महिला मोर्चाचे नेतृत्व – दोन महिने चालणार्या या अभियानांतर्गत ब्लॉक स्तरावर यात्रा, जिल्हास्तरावर अधिवेशन आणि राज्यस्तरावर अधिवेशन होणार आहे. ज्यामध्ये भारत जोडो यात्रेचा संदेश आणि मोदी सरकारविरोधातील आरोपपत्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. खर्गे यांच्यासह पक्षातील सर्व बडे नेते या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. प्रियांका गांधी प्रत्येक राज्यात महिला मोर्चाचे नेतृत्व करणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केले आहे.
COMMENTS