Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगाव बंदी

कर्नाटक सरकारचा अजब फतवा

मुंबई प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संघर्ष थांबतांना दिसून येत नाही. कर्नाटक सरकारने सांगली जिल्ह्यातील जत ता

नुकसानाचे पंचनामे करून तात्काळ मदत करू
शासकीय वसतिगृहांतील महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य
चंद्रकांत पाटलांना ही भाषा शोभत नाही – धनंजय मुंडे (Video)

मुंबई प्रतिनिधी – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संघर्ष थांबतांना दिसून येत नाही. कर्नाटक सरकारने सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणी सोडत, त्यांना गोजांरण्याचा प्रयत्न करतांनाच, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी बेळगावमध्ये भेट दिली. मात्र त्यापूर्वी कर्नाटक सरकारने महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावमध्ये येण्यास बंदी घातल्यामुळे खळबळ उडाली आहे.


महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये असे पत्र कर्नाटक सरकारने महाराष्ट्र सरकारला पाठवले आहे. कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना हे पत्र पाठवले आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने सीमावादावर तोडगा काढण्यासाठी समन्वय समिती स्थापन केली आहे. या समन्वय समितीत चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई आहेत. हे दोन्ही मंत्री डिसेंबर 6 डिसेंबर रोजी कर्नाटकात जाणार होते. त्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटक सरकारने हे पत्र पाठवल आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी आपण कर्नाटकात जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कोणताही फॅक्स मिळाला नाही. मी 3 तारखेला जाणार होतो. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने कर्नाटकात कार्यक्रम असतात. त्यामुळे कर्नाटकातील लोकांनी विनंती केली की तुम्ही 6 डिसेंबरला यावे. 3 आणि 6 दोन्ही दिवशी जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे मी 6 डिसेंबर रोजी कर्नाटकात जाणार आहे. तिथे आंबेडकरांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यातच सीमावादाच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज बेळगावला भेट देणार आहेत. हा महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमावर्ती भाग आहे. या भागावर दोन्ही राज्ये स्वतःचा दावा करतात. बोम्मई यांनी महाराष्ट्रातील 40 गावांवर आपला हक्क सांगितला आहे. तर त्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे सरकार महाराष्ट्राची एक इंचही जमीन जाऊ देणार नाही, असे म्हटले आहे.

आम्ही लोकांचे प्रश्‍न जाणून घेणार – चंद्रकांतदादा पाटील
सीमावर्ती भागातील काय प्रश्‍न आहेत, त्यांना नेमक्या कोणत्या सुविधा आहोत, यासंदर्भातील तेथील नागरिकांशी चर्चा करण्यासाठी आम्ही जाणार आहोत. चिथावणी देण्यासाठी नाही, अशा शब्दात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कर्नाटक सरकारला सुनावले आहे. आम्हाला कर्नाटक बंदीचा असा कोणताही फॅक्स मिळालेला नहाी, त्यामुळे 6 डिसेंबरला मी बेळगावात जाणार असे देखील चंद्रकांतदादांनी सांगितले.

COMMENTS