Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपूर विधानभवनावर धडकणार राष्ट्रवादीचा मोर्चा

एक लाखांच्या मोर्चाचे शरद पवार करणार नेतृत्व

नागपूर प्रतिनिधी - राज्यात काँगे्रसकडून काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेनंतर काँगे्रसच्या नेत्यांमध्ये उत्साह आला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्य

अजित पवारांसोबत गेलेल्यांना परत पक्षात घेऊ नका
शाळांचा खालावलेला दर्जा चिंताजनक ः शरद पवार
शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

नागपूर प्रतिनिधी – राज्यात काँगे्रसकडून काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेनंतर काँगे्रसच्या नेत्यांमध्ये उत्साह आला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या सभा, कार्यक्रम सुुरुच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँगे्रस मागे पडत असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसकडून शेतकरी दिंडी काढण्याचे नियोजन सुरु असतांनाच, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपूर विधानभवणार राष्ट्रवादी काँगे्रसचा मोर्चा धडकणार आहे. या मोर्चाचे नेतृत्त्व खुद्द शरद पवार करणार आहेत.


शेतकर्‍यांचे प्रश्‍न, पीकविम्याचा मुद्दा, गगनाला भिडलेली महागाई आणि राज्यपालांची सततची वादग्रस्त विधाने या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी आक्रमक पवित्रा घेऊन सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारला घेरणार आहे. तब्बल 1 लाख लोकांचा मोर्चा काढून शिंदे-फडणवीसांना विविध प्रश्‍नांवरुन लक्ष्य करण्याचे राष्ट्रवादी काँगे्रसचे नियोजन आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून हिवाळी अधिवेशन मुंबईत होत आहे. मात्र, यंदाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये घेण्यात येत आहे. 19 डिसेंबरला अधिवेशन सुरु होईल. गेल्या चार महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीशी फारक घेतली, शिवसेना फोडली अन् भाजपच्या साथीने नवे सरकार स्थापन केले. या सरकारला आता जवळपास चार महिने उलटून गेलेत. मात्र ओला दुष्काळाचा मुद्दा, पीक विम्याचा प्रश्‍न, महागाई, राज्यपालांची विधाने, मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार यावरुन विरोधी पक्ष आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. यासाठीच्या एकत्रित रणनीतीसाठी महाविकास आघाडीची बैठकही मुंबईत पार पडली आहे.

सरकारच्या कामावर जनता नाराज – दिलीप वळसे
अधिवेशनादिवशी काढण्यात येणार्‍या मोर्चासंबंधी माहिती देताना दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले, नव्या सरकारच्या कामावर राज्यातील जनता नाराज आहे. याचमुळे सरकारविरोधात जनतेमध्ये मोठा रोष आहे. हाच रोष व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनावर मोर्चा काढण्याचे नियोजन केलेले आहे. त्यानुसार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वात लाखो लोकांच्या साक्षीने हा मोर्चा निघणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ पदाधिकार्‍यांवर विशिष्ट जबाबदारी देण्यात आलेली आहे.

COMMENTS