मुंबई प्रतिनिधी - राज्यातील दोन ठिकाणी सोन्याची खाण असून, ते सोने आमच्या सरकारच्या काळात निघाले तर महाराष्ट्रासाठी मोठी उपलब्धी असेल, अशी माहि
मुंबई प्रतिनिधी – राज्यातील दोन ठिकाणी सोन्याची खाण असून, ते सोने आमच्या सरकारच्या काळात निघाले तर महाराष्ट्रासाठी मोठी उपलब्धी असेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. चंद्रपूर आणि सिंधुर्दगामध्ये सोन्याच्या खानीचे दोन ब्लॉक असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या वतीने मुंबईत वाणिज्यिक कोळशाच्या खाणींचा लिलाव व खाण क्षेत्रातील संधी या विषयावरील गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय रेल्वे आणि कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, केंद्रीय सचिव विवेक भारद्वाज उपस्थित होते.
राज्यातील दोन जिल्ह्यामध्ये सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या खनिजसंपत्तीत मोठी भर पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील मिंझरी आणि बामणी या भागात भूर्गभात सोन्याचे दोन ब्लॉक (खाणी) आढळून आल्या आहेत. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी बोलताना सहज बोलून गेलो की यातून सोने ही निघते तर राज्यात सोन्याचे दोन ब्लॉक असल्याची माहिती केंद्रीय अधिकार्यांनी आपल्याला दिली, असा दावा त्यांनी केला आहे. कोळसा आणि बॉक्साईडसह सोन्याचीही खाण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. खाण क्षेत्रातील संधी आणि गुंतवणूक परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. राज्यात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प सुरू करू शकतो, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी पुढे बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य हे नैसर्गिक साधन संपत्तीच्या बाबतीत अतिशय समृद्ध असून राज्याच्या सकल उत्पन्नात मोलाची भर घालण्याची क्षमता या क्षेत्रात आहे. राज्यातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्ती दडलेली असून तिचा खाण उद्योगात वापर होणे गरजेचे आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच गरजेनुसार या खाणींच्या वाणिज्यिक वापर व्हायला हवा. या केंद्र शासनाच्या धोरणाला सहकार्य करून राज्यातील खनिकर्म टक्केवारीत वाढ व्हावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. मुख्यमंत्री म्हणाले की, कोळसा खाणींच्या विकासासाठी केंद्र सरकार ज्या बाबींची पूर्तता करण्यास सुचवेल त्या बाबी पूर्ण करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथे सुरू करण्यात आलेल्या लोहखनिज खाणीमुळे स्थानिक नागरिकांचे जीवनमान बदलले असून या प्रकल्पाला मोठा लोहखनिज प्रकल्प म्हणून नावारूपाला आणण्याची मोठी संधी असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
COMMENTS