Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साऊ एकल महिला समितीची अकोल्यात स्थापना

अकोले प्रतिनिधी - तालुक्यातील एकल महिलांचे संघटन करून त्यांचे प्रश्‍न सोडवत रोजगार देत आत्मनिर्भर करण्यासाठी महात्मा फुले पुण्यतिथीचे औचित्य स

Ahmednagar : नगरमध्ये ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी | LOKNews24
जागरूक करणार कर न भरण्याचे आंदोलन ; मनपाला 10 कलमी मागण्या निवेदन
BREAKING: महाराष्ट्र सरकार ने जाहीर केलं Weekend Lockdown | What Is Weekend Lockdown? | LokNews24

अकोले प्रतिनिधी – तालुक्यातील एकल महिलांचे संघटन करून त्यांचे प्रश्‍न सोडवत रोजगार देत आत्मनिर्भर करण्यासाठी महात्मा फुले पुण्यतिथीचे औचित्य साधून अकोल्यात प्रतिमा कुलकर्णी यांनी साऊ एकल महिला समितीची स्थापन केली.यावेळी तालुक्यातील एकल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या महिलांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
यानंतर लवकरच तालुक्यातील गावनिहाय सर्वेक्षण केले जाणार असून तालुक्यातील सर्व विधवा,घटस्फोटित व परित्यक्ता महिला यांची नोंद केली जाईल.त्यानंतर उपलब्ध असलेल्या शासकीय योजना मिळवून दिल्या जातील. नंतर या महिलांच्या रोजगारासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असून त्यांच्या सासर माहेरचे मालमत्ता हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी लक्ष दिले जाईल.ज्या महिलांना पुन्हा नवी सुरुवात करावीशी वाटते त्यांच्या पुनर्विवाहाला मदत केली जाईल. या महिलांच्या संघटनेमुळे या महिलांना नक्कीच आधार वाटेल असे प्रतिमा कुलकर्णी यांनी सांगितले. एकल महिलांसाठी सरकारने धोरण आणण्याची आवश्यकता आहे.त्यात व्यवसायासाठी प्रशिक्षण, विना तारण बिनव्याजी कर्जपुरवठा असणे आवश्यक आहे.त्याचप्रमाणे मालमत्ताविषयक अधिकार मिळण्यासाठी तालुकास्तरावर यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज त्यांनी मांडली. लवकरच तालुक्यातील एकल महिलांची परिषद आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS