Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार

शिवसेनेला मिळणार वंचित आघाडीचे बळ

मुंबई प्रतिनिधी - राज्यात पुन्हा एकदा नवे राजकीय समीकरण आकाराला येत असून, शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग अस्तित्वात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह

गावठी कट्टे झाले प्रतिष्ठेचे… धमक्यांच्या उद्योगाला येते धार…
अमरावतीत रवी राणा विरोधात बच्चू कडू आपली भूमिका मांडणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन

मुंबई प्रतिनिधी – राज्यात पुन्हा एकदा नवे राजकीय समीकरण आकाराला येत असून, शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग अस्तित्वात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईतील प्रबोधनकार डॉट कॉम या वेबपोर्टलच्या अनावरणप्रसंगी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर आल्यानंतर या चर्चांनी वेग धरला होता. मात्र मंगळवारी शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीवर शिक्कामोर्तब होतांना दिसून येत आहे. शिवसेनेशी युती करण्यास वंचित बहुजन आघाडीने मंगळवारी होकार दिला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील माहिती दिली. ’वंचित’चे राज्य कमिटीचे सदस्य महेंद्र रोकडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन आणि वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्‍वकर्मा यांची शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि अन्य नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठका सकारात्मक झाल्या होत्या. त्यानंतर सुभाष देसाई यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशीही चर्चा झाली. त्यानंतर ’वंचित’ने युतीसाठी होकार कळवला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. शिवसेना हा पक्ष सध्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीत आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग असेल की शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी हे मिळून निवडणुका लढवतील याबाबत अद्याप स्पष्टता येणे बाकी आहे. शिवसेनेला त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्याकडून प्रतिसाद आल्यानंतर पुढच्या टप्प्याची चर्चा सुरू होईल, असेही रेखा ठाकूर यांनी स्पष्ट केले. शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी समाजाच्या विविध वर्गांशी संवाद साधून बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. त्यातूनच अनेक सामाजिक व राजकीय संघटना शिवसेनेच्या जवळ येत आहेत. यापूर्वी मराठा महासंघ प्रणित संभाजी ब्रिगेडने शिवसेनेसोबत युतीचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीनेही सोबत येण्याची तयारी दाखवली आहे. ही युती प्रत्यक्षात आल्यास शिवसेनेला मोठे बळ मिळण्याची शक्यता आहे.

युतीसाठी वंचित आघाडीने कळवला होकार – शिवसेनेते पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार आहे. भाजपविरोधात ठाकरे गटासोबत वंचित बहुजन आघाडी युती करणार असून वंचितकडून यासाठी होकार देण्यात आल्याची माहिती वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी दिली आहे. मात्र आम्हाला एका गोष्टीवर स्पष्टीकरण हवे आहे. सध्या शिवसेना महाविकास आघाडीचा भाग आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांपैकी शिवसेना हादेखील एक पक्ष आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीतील चौथा पक्ष असेल की शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार, याबाबत आम्हाला निश्‍चितता हवी आहे. त्यानंतरच पुढचे बोलणे सुरू होईल, असे रेखा ठाकूर यांनी सांगितले

COMMENTS