महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांच्या संदर्भात सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या परीने आता विरोध करण्याची भूमिका घेतली आहे; मात्र, राज्यपाल
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांच्या संदर्भात सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या परीने आता विरोध करण्याची भूमिका घेतली आहे; मात्र, राज्यपाल कोषारी यांनी आपण राजीनामा देणार नसल्याचे राजभवनावरून पाठवलेला पत्रातून म्हटल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे. अर्थात राजभवनावरून आलेल्या पत्रापूर्वीच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्यपाल यांनी स्वगृही जाण्याचे संकेत दिल्याचे म्हटले होते. कदाचित, त्या संदर्भातच राज्यपाल आपलं वक्तव्य करीत आहेत का, असा संशय देखील पवारांनी व्यक्त केला. मात्र या संदर्भात भाजपाकडून अधिकृतपणे कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आली नाही यावलट महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चालवलेल्या आंदोलन वजा इतर कार्यक्रमांवर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून भगतसिंग कोसरी हे येत्या काही दिवसात आपलं पद सोडतात की महाराष्ट्रात कायम राहतात हा प्रश्न आता काही दिवसातच स्पष्ट होईल मात्र तत्पूर्वी आज पत्रकार परिषद घेताना छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसा असलेले संभाजी राजे यांनी इशारा दिला आहे की, ती आठवडाभरापासून राज्यपाल यांनी कोणतीही दिलगिरी व्यक्त केली नाही त्याबरोबरच त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही याचा अर्थ सत्ताधाऱ्यांचे राज्यपाल भगतसिंग कोसरी यांना समर्थन आहे काय असा सवाल त्यांनी केला आहे मात्र या संदर्भातही राज्यातील सत्ताधारी पक्षाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेली नाही याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये भगतसिंग कोषारी यांनी जरी राजीनामा दिला तरी तो त्यांच्या मर्जीने असेल किंवा त्यांनी महाराष्ट्रात राहण्याचे ठरवले तरी ते त्यांच्या मर्जीने असेल त्यामुळे त्यांना हटवणे फार सहज नाही अशी बाब आता सर्वच राजकीय पक्षांच्या लक्षात आली आहे. भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? असा थेट सवाल संभाजीराजे यांनी राज्य सरकारला विचारला आहे. राज्यपालांवर जर कोणतीही कारवाई होणार नसेल तर महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच, असा इशाराच संभाजीराजे यांनी दिला आहे यानंतर राजकीय पक्षांसह काही संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. राज्यपालांना पदावरुन हटवण्याची मागणी केली जात आहे. सर्वच स्तरातून टीका होत असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या राज्यात परत जाण्याची व्यक्त केली इ्च्छा केल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. तसेच त्यांनी राज्यपाल पदावरुन पदमुक्त होण्याचे संकेत? दिले की काय, अशी चर्चा रंगली होती. परंतु, राजभवन वरून आलेल्या पत्रात असा कोणताही निर्देश दिसत नाही. कदाचित, एक धोरणात्मक बाब म्हणून देखील अशी भूमिका असण्याचे नाकारता येत नाही. अर्थात, राज्यपाल यांनी केलेल्या विधानाचे अनेक अन्वयार्थ यापूर्वीच वेगवेगळ्या भाजप नेत्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, राज्यातून परत जाण्याची कोणतीही मानसिकता राज्यपाल कोश्यारी यांची नाही. अर्थात, भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीत राज्यपालांचा राजीनामा वाचविण्या प्रयत्न करणार. कारण, अशा वादातून कोणत्याही पदाचा राजीनामा घेणं म्हणजे एका अर्थाने राजकीय किंमत चुकवण्यासारखे राहील, असं भाजपला वाटते.
COMMENTS