अन् शहनाझ गिलला चाहतीनं थेट गुडघ्यावर बसून दिली अंगठी

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

अन् शहनाझ गिलला चाहतीनं थेट गुडघ्यावर बसून दिली अंगठी

अभिनेत्री शहनाज गिलच्या  बाबतीत  काहीसे वेगळेच पाहायला मिळत आहे. बिग बॉस 13 मधून प्रसिद्ध झालेली शहनाज आता प्रत्येक घराघरात प्रसिद्ध आहे. शहनाजचे देश

सिंहाला रुममध्ये पाहून शहनाझ गिलची उडाली घाबरगुंडी
पापाराझींमुळे शहनाजला बसला चांगलाच फटका
बिग बॉस फेम शहनाज गिल पुन्हा प्रेमात

अभिनेत्री शहनाज गिलच्या  बाबतीत  काहीसे वेगळेच पाहायला मिळत आहे. बिग बॉस 13 मधून प्रसिद्ध झालेली शहनाज आता प्रत्येक घराघरात प्रसिद्ध आहे. शहनाजचे देशातच नाही तर परदेशातही चाहते आहेत. सध्या सोशल मीडियावर शहनाज गिलचा एक व्हिडिओ समोर आला आहे.   व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला चाहती शहनाजला मिठी मारून रडताना दिसत आहे. तिच्या आवडत्या स्टारला पाहताच ती भावूक होते आणि तिला मिठी मारून रडू लागते. शहनाज तिच्या चाहत्याला असे भावूक होताना पाहताच ती स्वतःही भावूक होते. विशेष म्हणजे गुडघ्यावर बसलेल्या या चाहतीने चक्क शहनाजला एक कडं आणि अंगठी गिफ्ट केली. एवढंच नाही तर तिने स्वतःच्या हाताने शहनाजच्या हातात ते कडं आणि अंगठी घेतली. यानंतर शहनाजने तिला उठवत प्रेमाने मिठी मारली.

COMMENTS