मोदी सरकारच्या 24 मंत्र्याविरोधात आहेत गंभीर गुन्हे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोदी सरकारच्या 24 मंत्र्याविरोधात आहेत गंभीर गुन्हे

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून, एकूण केंद्रीय मंत्र्यांची संख्या आता 78 झाली आहे. मात्र यातील 42 टक्के म्हणजेच 33 मंत्र्

चालकाला चक्कर आली व जीप खड्ड्यात गेली ; अपघातात दोन महिलासह तीन जखमी
काम करत नसल्यामुळे मंडळ अधिकाऱ्याला मारहाण | LOKNews24
नगरच्या भ्रष्ट शिक्षण विभागावर कारवाई होईल का ?

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून, एकूण केंद्रीय मंत्र्यांची संख्या आता 78 झाली आहे. मात्र यातील 42 टक्के म्हणजेच 33 मंत्र्याविरोधात गुन्हे दाखल असून, त्यातील 24 जणांविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न आणि दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. एडीआर अर्थात असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्सने नुकताच यासंदर्भातला अहवाल जाहीर केला असून, त्यातून या बाबी समोर आल्या आहेत.
लोकसभेच्या वेळी निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांवरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या प्रतिज्ञापत्रावरून मोदी सरकारमधील मंत्र्यांची शैक्षणिक, आर्थिक प्रगती आणि गंभीर गुन्ह्यांचे वर्गीकरण करण्यात आले असून, यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. एडीआरच्या आहवालात केलेल्या दाव्यानुसार, 78 मंत्र्यांपैकी 70 मंत्री म्हणजेच 90 टक्के मंत्री हे करोडपती आहेत. या मंत्र्यांची प्रत्येकी संपत्ती ही सरासरी 16.24 कोटी रुपये इतकी आहे. केंद्रातल्या एकूण 4 मंत्र्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये 50 कोटींहून जास्त संपत्ती असल्याचं जाहीर केलं आहे. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे, पियुष गोयल, नारायण राणे आणि राजीव चंद्रशेखर यांचा समावेश आहे.एकूण 78 केंद्रीय मंत्र्यांपैकी 8 मंत्र्यांची संपत्ती ही 1 कोटीपेक्षा कमी असल्याचं एडीआरनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. यामध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांच्यानावे फक्त 6 लाखांची संपत्ती आहे. जॉन बारला यांच्या नावे 14 लाख तर कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्यानावे 24 लाखांची संपत्ती आहे.या अहवालानुसार, केंद्रीय मंत्रिमंडळापैकी एकूण 82 टक्के म्हणजेच 64 मंत्री हे सुशक्षित आहेत. यांचं शिक्षण पदवी किंवा त्यापेक्षा जास्त आहे. त्याशिवाय, 15 टक्के म्हणजेत 12 मंत्री ही 8वी ते 12वीदरम्यान शिक्षण घेतलेले आहेत. एकूण दोन मंत्र्यांनी डिप्लोमा केला आहे. तर 17 मंत्री पदवी, 21 मंत्री पदव्युत्तर तर 9 मंत्री डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलेले आहेत.
कामाचा निकष आणि आगामी विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात अनेक महत्वपूर्ण फेरबदल केले. अनेक मंत्र्यांचे राजीनामे घेतले, तर अनेकांना राज्यपालपदी विराजमान केले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात 43 मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांची एकूण संख्या आता 78 झाली आहे. मात्र, यापैकी तब्बल 42 टक्के अर्थात 33 मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल असून त्यातल्या 24 जणांविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत.


गृह राज्यमंत्र्यांविरोधातच हत्येचा गुन्हा
निशीथ प्रामाणिक हे मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वात कमी वयाचे मंत्री आहेत. प्रामाणिक हे पश्‍चिम बंगालमधून खासदार असून आता गृहराज्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला आहे. निशीथ प्रामाणिक हे 35 वर्षाचे असून त्यांचे शिक्षण 8 वी पर्यंत झाले आहे. त्यांच्यावर भादंविच्या कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल असल्याचं एडीआरच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय, जॉन बारला, पंकज चौधरी आणि व्ही मुरलीधरन या तिघांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा (भादंवि 307) गुन्हा दाखल आहे.


15 टक्के मंत्र्यांची शैक्षणिक पात्रता 8 ते 12 वी
मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातील 15 टक्के म्हणजेच 12 मंत्र्यांचे शिक्षण हे 8 ते 12 वी दरम्यान झालेले आहे. तर दुसरीकडे 64 मंत्र्यांनी आपले शिक्षण पदवी व त्यापेक्षा अधिक दाखवलेले आहे. यातील दोन मंत्र्यांने आपली शैक्षणिक पात्रता डिप्लोमा दाखवले आहे.

COMMENTS