मोठी कारवाई ! 71 लाखांचा गुटखा जप्त

Homeताज्या बातम्या

मोठी कारवाई ! 71 लाखांचा गुटखा जप्त

स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई केली

यवतमाळ प्रतिनिधी  - यवतमाळ बाभूळगावमध्ये 71 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने स

नंदुरबार जिल्ह्यात टायरच्या स्फोटात तरूणाचा मृत्यू
पंजशीरच्या खोर्‍यात 350 तालिबान्यांचा खात्मा
कृषीमंत्री अब्दुल सत्तारांवर गुन्हा दाखल

यवतमाळ प्रतिनिधी  – यवतमाळ बाभूळगावमध्ये 71 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई केली आहे. आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. मध्य प्रदेशातील इंदोर येथून गुटखा आणल्या गेला होता. बाभुळगाव या लहानशा गावातून गुटख्याचे मोठे नेटवर्क जात असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ऐफाज मेनन (वय 30) याला अटक करण्यात आली असून विविध कलमान्वये बाभूळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर संशयित आरोपी यांचा शोध सुरू आहे.

COMMENTS