Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साखळचोंड धबधब्यावरुन पाय घसरुन पडल्याने  विद्यार्थ्याचा मृत्यू

तब्बल दीड हजार फुटावरून हा तरुण खाली पडला

नाशिक प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यात ल्या सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड उंबरपाडा तातापाणी गरम पाण्याचे झरे पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकासोबत दुर्दै

लाईव्ह मॅच दरम्यान कबड्डी खेळाडूचा मृत्यू.
नागराज मंजुळेंची मोठी घोषणा
रोहित पवारांना पुन्हा संधी द्या : मनीष सिसोदिया

नाशिक प्रतिनिधी – नाशिक जिल्ह्यात ल्या सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड उंबरपाडा तातापाणी गरम पाण्याचे झरे पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकासोबत दुर्दैवी घटना घडली. साखळचोंड धबधब्यावरुन पाय घसरुन पडल्याने सुरत येथील सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तब्बल दीड हजार फुटावरून हा तरुण खाली पडला आणि यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. तक्षिल संजाभाई प्रजापती (वय १८) असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो सुरत येथील सार्वजनिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी या महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकणारा विद्यार्थी होता. त्याच्या दहा ते बारा मित्रांसमवेत पिंपळसोंड येथील कुंडा रिसोर्ट येथे सहलीसाठी आला होता. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना कळवताच सदर ठिकाणी पोलीस आणि वन कर्मचारी अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यांनतर सुमारे दीड हजार फूट खोल दरीतून पंचनामा करून मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने तिवशाची माळी येथे रस्त्यावर काढण्यात आला. त्यानंतर पाच वाजेच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

COMMENTS