Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तिहेरी अपघातात पैठण येथील दोन युवक ठार

दोन जखमी तरुणांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलय

 औरंगाबाद प्रतिनिधी -  औरंगाबादमधून भीषण अपघाताची एक घटना समोर आली आहे. यात तिहेरी अपघातात पैठण येथील दोन युवक ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाले आ

मोटारसायकल इन्व्हो अपघात तीन गंभीर जखमी
समृद्धी महामार्गावरील अपघातात तिघांचा मृत्यू
अखेर मुलीला शाळेत सोडणे राहूनच गेले…

 औरंगाबाद प्रतिनिधी –  औरंगाबादमधून भीषण अपघाताची एक घटना समोर आली आहे. यात तिहेरी अपघातात पैठण येथील दोन युवक ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. यात दोन दुचाकींचा अपघात होऊन उसाच्या ट्रॅक्टरखाली आल्याने दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींवर उपचार सुरू आहेत.पैठण आपेगाव रोडवर वडवाडी गावाच्या अलीकडे हा अपघात झाला. दोन मोटरसायकलमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन युवक ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दोन मोटरसायकलचा समोरासमोर अपघात झाला. यानंतर दुचाकीवरील शैलेश मुळे आणि अमोल खंडागळे जवळून जात असलेल्या उसाच्या ट्रॅक्टर खाली आले. या घटनेत दोघेही जागीच ठार झाले. तर दोन जखमी तरुणांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

COMMENTS