Homeताज्या बातम्यादेश

राजस्थानमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचा संशयास्पद मृत्यू

उदयपूर प्रतिनिधी : राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उदयपूर जिल्ह्यातील गोगुंदा तहसील परिसरातील एकाच कुटुंबात

… म्हणून मिरच्या, लिंबू बांधायला सांगेन- अशोक चव्हाण
पीओकेमध्ये पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होणार
डोंबिवलीतील 42 केमिकल कंपन्या होणार बंद

उदयपूर प्रतिनिधी : राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उदयपूर जिल्ह्यातील गोगुंदा तहसील परिसरातील एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. या कुटुंबातील 6 जणांनी आत्महत्या केली की मृत्यूचे आणखी कोणते कारण आहे याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आली नाही.
संबंधित कुटुंबीयाच्या शेजार्‍यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे. गोगुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झाडोली येथील गोल नेदी गावातील ही घटना आहे. मृतांमध्ये पती-पत्नीसह चार मुलांचा समावेश आहे. अशीच एक धक्कादायक घटना डिसेंबर 2021 मध्ये राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यात घडली होती. तिथे 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृताची ओळख पटवली व नातेवाईकांना घटनेची माहिती दिली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन सर्मथुरा शासकीय रुग्णालयाच्या शवागारात ठेवला होता. तरुणाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली होती. तरुणाच्या मृत्यूनंतर मोठ्या संख्येने रुग्णालयात पोहोचलेल्या ग्रामस्थांनी हत्येचा आरोप करत एकच गोंधळ घातला होता. जवळपास तीन तासांच्या चर्चेनंतर पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होती.

COMMENTS