Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई-पुणे रेल्वे सेवा सोमवारपर्यंत बंद

मध्य रेल्वेचा 27 तासांचा मेगाब्लॉक

पुणे प्रतिनिधी - मध्य रेल्वेने मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर तब्बल 27 तासांचा मेगाब्लॉक घेतल्यामुळे या मार्गावरील सर्व रेल्वेगाडया सोमवारपर्यंत रद्द

अवैध धंदे करणार्‍यांच्या मुसक्या आवळा, अन्यथा शहरात गँगवार होतील
अहमदाबादेत 7 व्या मजल्यावर लिफ्ट तुटली
IPL 2023 चा 57 वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे

पुणे प्रतिनिधी – मध्य रेल्वेने मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर तब्बल 27 तासांचा मेगाब्लॉक घेतल्यामुळे या मार्गावरील सर्व रेल्वेगाडया सोमवारपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोन दिवस प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. याशिवाय शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस वीकेंडचे असल्याने या दोन दिवसांत रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभालीचे काम पूर्ण करण्याचे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर असणार आहे.
प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने मुंबई आणि पुणे रेल्वे स्थानकांवर काही अतिरिक्त कर्मचार्‍यांची नियुक्ती केली असून एक टोल-फ्री हेल्पलाईन नंबरही जारी केला आहे. मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे सोमवारपर्यंत बंद राहणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पुण्यातून मुंबईसाठी जादा बसेस सोडण्याची तयारी केली जात आहे. रेल्वे बंद झाल्याने दोन्ही शहरांतील प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन बदलले आहे. रेल्वे स्थानकांवर मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केल्यास त्यांना रेल्वे स्थानकावर बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

COMMENTS