अकोला प्रतिनिधी - काँगेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली भारत जोडो यात्रा विदर्भात असून, यावेळी राहुल गांधी यांनी
अकोला प्रतिनिधी – काँगेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली भारत जोडो यात्रा विदर्भात असून, यावेळी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुन्हा एकदा माफीवीर उल्लेख केला असून, त्यांनी इंग्रजांशी सहकार्य केल्यामुळेच त्यांना 60 रुपये पेन्शन इंग्रज देत होते, असा उल्लेख केल्यामुळे राज्यभरात पुन्हा एकदा नवे वादंग निर्माण झाले आहे.
आमची लढाई ही विचारधारेची आहे. ही लढाई समजून घेतली पाहिजे. लोकशाहीत एक राजकीय पक्ष दुसर्या राजकीय पक्षाशी लढतो. युद्धाच्या मैदानात देशाच्या संस्था त्यात फेयरनेसचे वातावरण निर्माण करतात. पण आज परिस्थिती वेगळी आहे. विरोधी पक्षाची प्रेसवर कंट्रोल नाही. भाजपचा प्रेस, इन्स्टिट्यूशन आणि न्यायालयावर दबाव आहे, असा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतच्या वक्तव्यावरुन भाजप, शिंदे गट आक्रमक झाला आहे. याबाबत बोलताना राहुल गांधी यांनी सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेले पत्र माध्यमांसमोर वाचून दाखवलं. ’सर मी तुमचा नोकर राहू इच्छित आहे, असे सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, असे राहुल गांधी यांनी सांगितले. सावरकरांनी इंग्रजांना मदत केली, याबाबत मी स्पष्ट आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीसांनी सावरकरांनी लिहिलेले पत्र वाचावे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले. राहुल शेवाळे यांच्या यात्रा रोखण्याच्या मागणीवर राहुल गांधी यांनी म्हटले की, यात्रा रोखायची असेल तर रोखा. आम्हाला काहीच अडचण नाही. कुणाचा काही विचार असेल तर तो मांडला पाहिजे. सरकारला वाटत असेल की भारत जोडो यात्रा रोखावी, तर त्यांनी तसे करावे, असे प्रतिआव्हानच त्यांनी यावेळी दिले.
सावरकरांच्या माफीनाम्याचे केले वाचन – सर, मै आपका नौकर रहना चाहता हूॅ, असे पत्रच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिले होते. मी माझ्या मनाचे काही सांगत नाही. देवेंद्र फडणवीसयांना हे पत्रे वाचायचे असेल तर ते वाचू शकतात, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. राहुल गांधी अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी भर पत्रकार परिषदेत सावरकरांच्या माफीनाम्याचे पत्रेही दाखवले. माझ्या वक्तव्यावरुन जर कोण यात्रा रोखणार असेल, तर त्यांनी रोखावी यात्रा असे आव्हान देखील राहुल गांधी यांनी दिले. सरकारला जर वाटले ही भारत जोडो यात्रा रोखली पाहिजे, तर त्यांनी यात्रा रोखावी असेही गांधी म्हणाले. आम्हाला भारत जोडायचा आहे. आम्ही कन्याकुमारीपासून सुरुवात केली आहे. आता आम्हाला श्रीनगरपर्यंत जायचे असल्याचे गांधी म्हणाले.
मनसे आक्रमक ; दाखवणार काळे झेंडे – काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मनसेही आक्रमक झाल्याचे बघायला मिळते आहे. भारत जोडो यात्रा आज बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे पोहोचणार आहे. याठिकाणी राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवणार असल्याची माहिती समोर येत आहे. राहुल गांधींना प्रत्युत्तर देण्यासाठी आता राज्यभरातील मनसैनिकांना शेगाव पोहोचण्याची निर्देश राज ठाकरे यांनी दिले असल्याची माहिती पुढे आहे.
पोलिसात तक्रार करणार – रणजीत सावरकर – सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींच्या टीकेला उत्तर दिले आहे. आपण राहुल गांधींविरोधात पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. क्रांतीकारकांशी राहुल गांधी यांचे काही देणेघेणे नाही. पण चंद्रशेखर आझाद, सावरकर देशद्रोही असल्याचे ट्वीट त्यांनी केले होते. याविरोधात मी भोईवाडा कोर्टात दाद मागितली होती. कोर्टाने पोलिसांना तपास करण्याचा आदेश दिला होता. पण आता मी दुसरी तक्रार दाखल करणार आहे, असे रणजीत सावरकर यांनी सांगितले आहे.
COMMENTS